आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीरियात पुन्हा निष्‍पाप जीवाचा बळी, 13 जण ठार, भाऊ गेल्याने दोन 2 मुले रडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलेप्पोतील हल्ल्यांत आपला भाऊ गमावल्याने रडत असलेल्या दोन मुलांच्या व्हिडिओने जगाला पुन्हा हादरवले आहे. - Divya Marathi
अलेप्पोतील हल्ल्यांत आपला भाऊ गमावल्याने रडत असलेल्या दोन मुलांच्या व्हिडिओने जगाला पुन्हा हादरवले आहे.
अलेप्पो - सीरियाच्या हवाई दलाच्या हल्ल्यात 11 मुले मारली गेली आहेत. सरकारी सैन्याने हा हल्ला काही दिवसांपूर्वी बंडखोरांच्या ताब्यातील बाब अल नैरोब शहरावर केला. हल्ल्यानंतरचा व्हिडिओ समोर आला आहे. यात बचाव पथक ढिगा-यातून मुलांना बाहेर काढताना दिसत आहे. याच हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात भाऊ मारला गेल्याचा धक्का बसलेले दोन मुले रडताना दिसत आहे. गेल्या आठवड्यातील हल्ल्यात जिवंत वाचलेला पाच वर्षांचा ओमरान दाकनिशच्या व्हिडिओने पूर्ण जगाला हादरवले होते. ढिगा-यातून काढला नवजात बाळाचा मृतदेह...
- हल्ल्यात 11 मुलांसह 15 लोक मारले गेले. एका व्हिडिओत बचाव पथक ढिगा-यातून नवजात बाळाचे मृतदेह बाहेर काढताना दिसत आहे. दुस-यात धूळीने माखलेले दोन मुले रडताना दिसतायत.
- आणखी एक व्हिडिओ समारे आला आहे. यात अलेप्पो शहरातील एका हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्यानंतरचा आहे. यात मुलांच्या रडण्‍याचा आवाज ऐकू येतो. यात हल्ल्यात दोन मुले मारले गेले होते.
बॅरल बॉम्बचा वापर
- राष्‍ट्रपती बशर अल असदच्या सरकारवर आपल्या नागरिकांविरोधात बॅरल बॉम्ब वापरल्याचा आरोप केला जात आहे. मात्र असद यांनी हे आरोप फेटाळले आहे.
- अलेप्पो शहराच्या पूर्व भागात दीड तर पश्चिम भागात 12 लाख लोक राहतात. संयुक्त राष्‍ट्रसंघानुसार , 2011 पासून सुरु असलेल्या यादवी युध्‍दात तीन लाख लोक मारले गेले आहेत. एक कोटी लोक बेघर झाले आहेत.
ओमरानच्या व्हिडिओने युएनसह पूर्ण जगाला धक्का
- गेल्या आठवड्यातील अलेप्पोमधील हवाई हल्ल्यात 5 वर्षांचा ओमरान दाकनिश पूर्णपणे जखमी झाला होता. ओमरानचा फोटो व व्हिडिओ लाखो जणांनी शेअर केला.
- ओमरानची तुलना एलन कुर्दीशी केली गेली. एलन सीरियन निर्वासित होता. त्याचा सप्टेंबर 2015 मध्‍ये समुद्रात बुडून मृत्यू झाला होता.
कसे निर्माण झाले सीरियन संकट?
- 2011 मध्‍ये एका छोट्याशा घटनेने सीरियात नागरी युध्‍दाचे रुप घेतले. प्रकरण काही मुलांच्या अटकेनंतर सुरु झाले.
- जुलै 2011 मध्‍ये सरकारविरोधातील लढा मजबूत करण्‍यासाठी सीरियन लष्‍करातील अधिका-यांच्या एका गटाने फ्री सीरियन आर्मीची स्थापना केली.
- 2011- 2012 मध्‍ये अनेक आत्मघाती बॉम्ब स्फोट झाले. आता येथे इस्लामिक स्टेटही क्रियाशील आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा हल्ल्यानंतरचे छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...