आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alexander Graham Bell Was Also Founded Metal Detector

वडिलांच्या नावाचा कंटाळा आल्याने टेलिफोनच्या जनकाने स्वतःच निवडले \'ग्रॅहम\' हे नाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
टेलिफोनचे जनक अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला तेव्हा कदाचित भविष्यात मोबाईल फोनद्वारे संवाद साधण्याबरोबरच सेल्फी, इंटरनेटच्या जगात भ्रमण करणे शक्य होईल याचा अंदाज त्यांना नसेल. पण या क्रांतिकारी शोधाने जगामध्ये विकासाची दारे उघडली गेली यात शंका नाही. ग्रॅहम बेल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्याबाबत काही रंजक माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

स्कॉटलंडच्या एडीनबर्गमध्ये ग्रॅहम बेल यांचा जन्म झाला होता. अलेक्झांडर मेलविले आणि एलिझा सायमंड्स बेल हे त्यांचे आई वडील. अगदी लहान असल्यापासूनच त्यांनी विविध प्रकारचे शोध लावायला सुरुवात केली होती. त्यांच्या सुरुवातीच्या पहिल्या प्रकल्पापैकी एक प्रकल्प हा गव्हापासून त्याचा भुसा वेगळा करण्यासंदर्भातील होता. पण त्यांना आवाजाबाबत विशेष प्रेम होते. तोंडातून बाहेर पडणारा आणि कानाला ऐकू येणारा आवाज याबाबत बेल यांना प्रचंड आकर्षण होते. वडीलांनी दिलेल्या प्रेरणेतून त्यांनी भाऊ मेलविले याच्यासह टॉकिंग मशीन तयार करण्याचा प्रयत्नही केला होता. यात त्यांना यश आले आणि नाही आले असेही म्हणता येईल. कारण हा प्रोजेक्ट मागे पडला. पण त्यानंतर बेल यांनी जो शोध लावला त्या जोरावर आज संपूर्ण जगाने कुठल्या कुठे मजल मारली आहे. हा शोध म्हणजे टेलिफोनचा. हेही एक टॉकिंग मशीनच म्हणायला हवे ना.
पुढील स्लाइड्वर वाचा, स्वतः निवडले होते ग्रॅहम हे नाव.. कर्णबधीर मुलांना बोलायला शिकवण्यासाठी शोधल्या पद्धती..