आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळ ग्रहावर दिसले एलियन्सचे बूट, नासाच्या या PHOTO च्या आधारे हंटर्सने केला दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युएफओ हंटर्स 2013 मध्‍ये घेतलेल्या या छायाचित्रात बूट दिसल्याचा केला आहे दावा. - Divya Marathi
युएफओ हंटर्स 2013 मध्‍ये घेतलेल्या या छायाचित्रात बूट दिसल्याचा केला आहे दावा.
इंटरनॅशनल डेस्क - नासाच्या एका छायाचित्रात मंगळ ग्रहावर एलियन्सचे बूट दिसल्याचा दावा आहे. हा दावा केला आहे एलियनच्या अस्तित्वाचा शोध घेणा-या यूएफओ हंटर्सने केला आहे. हे छायाचित्र 2004 मध्‍ये अवकाशात पाठवलेल्या अपॉर्च्‍युनिटी रोवरने टिपले आहे. यात मंगळाच्या पृष्‍ठभागावर दगडांच्या मधे बूट दिसल्याचा दावा केला आहे. गेल्या काही महिन्यांमध्‍ये युएफओ हंटर्सने मंगळावर एलियन व त्याचे घर दिसल्याचेही म्हटले होते. 2013 मध्‍ये घेतला होते हे छायाचित्र...

- नासाच्या अपॉर्च्युनिटी रोवरने हे छायाचित्र 2013 मध्‍ये घेतले होते. यात बूट दिसल्याचा दावा 24 ऑगस्ट 2016 मध्‍ये करण्‍यात आला आहे.
- ufosightingsdaily.com च्या स्कॉट सी वेअरिंगने आपल्या ब्लॉग पोस्टमध्‍ये लिहिले, की रोवरच्या काही छायाचित्रांमध्‍ये खड्ड्यांच्या कडेला एक बूट दिसला.
- वेअरिंगनुसार, मंगळावरील युध्‍दात जीव गमावलेल्या जीवाचा हा बूट असू शकतो.
- ते म्हणतात, या पुराव्यावरुन कळते की कधीकाळी मंगळावर माणसाचे अस्तित्व असेल.
काय म्हणतात शास्त्रज्ञ?
नासाने असे शोध मान्य केलेले नाही. बरेच शास्त्रज्ञांनुसार, हे एक पेयरीडोलिया या नावाने ओळखले जाणारे मानसशास्त्रीय घटना आहे. यात डोळ्यांना परिचित वस्तू व आकार असल्याचे भ्रम निर्माण होते. दगडांच्या मधे असलेला बूटाच्या आकाराचा दिसणारी वस्तूही दगड असू शकते.
पूर्वी असे दावे करण्‍यात आले
- यापूर्वीही क्युरोसिटी रोवरने पाठवलेल्या अनेक छायाचित्रांमध्‍ये वेगवेगळे दावे करण्‍यात आले आहेत.
- गेल्या दिवशांमध्‍ये एलियन हंटर्सने नासाने जारी केलेले छायाचित्रांमध्‍ये महिलेपासून मिलिट्री बंकर, एलियन हंटर, खेकडा, शवपेटी आणि दिसणारे सर्व वस्तूंबद्दल दावा केलेला आहे.
- नासा एलियन्सविषयी माहिती समोर आणू इच्छित नाही, असा आरोप एलियन हंटर्सनेही केला आहे.
- मात्र अशी मांडणी व दावे नासाने फेटाळले आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...