एक जिंवंत व्हेल शार्क क्रौर्याने कापल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 3 मिनिट 39 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये दोन जण करवतीने हा मासा कापताना दिसते आहे. याठिकाणी उभे असलेले लोक मोबाईलमध्ये याचे चित्रण करत होते. अॅनिमल राइट्स ग्रुपने हा प्रकार भयावह असल्याचे म्हटले आहे. अत्यंत कमी कालावधीत यू ट्यूबर एका लाखापेक्षा अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे.
हे फुटेज कुठले आहे याबाबत काही स्पष्ट माहिती नाही. पण एका प्रत्यक्षदर्शीने 'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'ला दिलेल्या माहितीनुसार ही घटना चीनच्या दक्षिण गुआंगडोंग प्रांतातील यांगजियांगची आहे. या महाकाय माशाच्या तोंडांची हालचाल या व्हिडीओमध्ये चित्रित झाली आहे.
या प्रकारच्या माशांच्या संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या, 'द शार्क ट्रस्ट'चे डायरेक्टर अली हुड यांनी सांगितले की, जिवंत माशाला अशाप्रकारे क्रूरपणे कापण्याचा व्हिडीओ अत्यंत धक्कादायक आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पशु प्रेमींनी राग व्यक्त केला आहे. लोकांमध्ये अजूनही जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे. या प्रकारामुले पर्यावरणात असंतुलन निर्माण होण्याची शक्यता असल्याचे मत हा व्हिडीओ पाहील्यानंतर काही पशुप्रेमींनी व्यक्त केले आहे.
व्हेल शार्क जगातील सर्वात मोठा मासा आहे. हा मासा 12 मीटरपर्यंत लांब असू शकतो. मांस मिळवण्यासाठी हा मासा मारणे बेकायदेशीर आहे. बेकायदेशीररित्या व्हेल माशाची शिकार करणारे सुमारे 30,000 डॉलर (18 लाख रुपये) मध्ये याची विक्री करतात. दरवर्षी सुमारे 600 व्हेल शार्क मांस मिळवण्यासाठी मारले जातात.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित Photo's
वरील स्लाइडवर पाहा, Video