आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • All Borders Sealed, Manasarovar Priligrim Plan Collapase

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्व सीमा सील, मानसरोवर यात्रेचे नियोजन कोलमडले - चीनकडून कुरापती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू - चीनने नेपाळमधील भूकंपानंतर तिबेटशी लागून असलेल्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. यामुळे कैलास मानसरोवर यात्रेचे नियोजन करणा-यांना आपल्या योजनेत बदल करावा लागत आहे. भारतातील सिक्कीममधून कैलास मानसरोवरचा मार्ग खुला करण्याची तयारी सुरू आहे.

नेपाळच्या पर्यटन मंत्रालयाने चिनी अधिका-यांसमोर हा मुद्दा उपस्थित केला जाईल, असे विदेश मंत्र्यांना सांगितले. यासोबत नेपाळ-तिबेट रस्ता सुरू करण्यासही सांगितले आहे. २५ एप्रिल रोजी आलेल्या भूकंपात नेपाळच्या पर्यटन क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. नेपाळच्या ३८ पर्यटन कंपन्यांच्या माध्यमातून भारत, रशिया, मलेशिया आणि युरोपीय देशांतील जवळपास २५,००० पर्यटकांनी मानसरोवर यात्रेचे नियोजन केले आहे. मात्र, सीमा बंद असल्यामुळे ते अडकले आहेत. चीनमध्ये भूस्खलन आणि यात्रेतील संभाव्य अडथळ्यांमुळे तत्तापानी, रासुवा आणि अन्य ठिकाणच्या सीमा बंद केल्या आहेत.

चीनने आक्षेप फेटाळला, नवाझ शरीफ सुखावले
इस्लामाबाद | चीन-पाकिस्तान यांच्यातील आर्थिक संबंधावर भारताने घेतलेल्या आक्षेपाला चीनकडून फेटाळण्यात आले आहे. आमच्या संबंधातून कोणालाही लक्ष्य केले जाणार नाही, अशी भूमिका चीनने साेमवारी मांडली. त्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी समाधान व्यक्त केले आहे. काश्मीर मुद्द्यावरील भूमिकेत मात्र काहीही बदल झालेला नाही, असेही चीनने स्पष्ट केले आहे. शरीफ मंगळवारी म्हणाले, काही लोक ४६ अब्ज डॉलरच्या (सुमारे २, ९३३ अब्ज रूपये) प्रकल्पाचे नुकसान करू पाहत आहेत आणि भारताने तर याबद्दल चीनकडे तक्रारही केली आहे. परंतु चीनने भारताचा आक्षेप फेटाळला आहे. याबद्दल मला आनंद वाटतो.

पुन्हा नाव न घेता आरोप
पाकिस्तानचे शत्रू आमच्या देशाला कमकुवत करण्याचा कट रचत आहेत. पाकिस्तानच्या प्रगतीवर ते जळतात. आम्ही त्यांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाहीत, असा आरोप नवाझ शरीफ यांनी भारताचे नाव न घेता केला आहे. अगोदर भारताची गुप्तचर संस्था रॉ पाकिस्तानला अस्थिर करण्यासाठी षडयंत्र रचत असल्याचा आरोप लावण्यात आला होता.