आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वांच्या डोळ्यात अंजन घालून ती गेली, मुलीच्या मृत्यूनंतर आईने सुरू केली जनजागृती मोहीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिव्हरपूल- हे एक दु:स्वप्न आहे. त्याने आमचे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त केले. आई-वडिलांसाठी आपल्या हसत्या-खेळत्या मुलीने अचानक जगाचा निरोप घ्यावा, यापेक्षा कोणते मोठे नुकसान असू शकते? असा उद्विग्न सवाल करून मायकला बारोलिनी यांना रडू कोसळते. कोणत्याही माता-पित्यांना अशा प्रकारचे दु:ख सहन करण्याची वेळ येऊ नये. आम्हीदेखील या बातमीसाठी स्वत:च्या मनाची तयारी करू शकलो नव्हतो.
मायकला यांची १८ वर्षी मुलगी अलिशाचा काही दिवसांपूर्वीच मेंदुज्वरामुळे मृत्यू झाला. अलिशाला तेव्हा प्रतिबंधक लस देण्यात आली नव्हती. या आघातातून आईने स्वत: ला सावरले. मुलीला आपण तर कायमचे गमावले परंतु इतरांवर ही वेळ येऊ नये, असा निर्धार त्यांनी केला. त्यासाठी त्यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना घातक संसर्गाच्या लसीकरणाविषयी जागरूक करण्याचा निश्चय केला. त्या विद्यापीठात आल्या. तेथे त्यांनी व्याख्यान दिले. लसीकरण न केल्यामुळे आपल्यावर मुलीला गमावण्याची कशी वेळ आली, हे त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला.

माझी मुलगी खूप सुंदर, बुद्धिमान होती. भयंकर दुखण्याचा मुकाबला करण्याचे मुळी तिचे वयच नव्हते. लिव्हरपूल होप विद्यापीठात ती शिक्षण घेत होती. अलीकडेच हॅलोविन थिम्ड नाइटदरम्यान विद्यापीठाच्या हॉलमध्ये ती मृतावस्थेत आढळून आली होती. ती पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत होती. तिला मेनिंजोकोक्सल सी ग्रुपमुळे तिला संसर्ग झाला होता.
वास्तविक ४१ वर्षीय आई अजूनही धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. स्वत: दु:खात असतानाही त्या इतर पालकांना किशोरवयीन पाल्यांना राष्ट्रीय आरोग्य सेवेद्वारे ( एनएचएस) दिल्या जाणाऱ्या लसीकरणापासून वंचित ठेवू नका. त्यासाठी सुनियोजित कार्यक्रम तयार करा, असे आवाहन त्या करतात. जेणेकरून कोणावरही पोटचा गोळा गमावण्याची वेळ येऊ नये.
मेनिंजोकोक्सल सामान्यपणे १५ ते २४ वर्षांच्या तरुणांवर प्रभाव टाकू शकतो. सहापैकी एका प्रकरणात मृत्यूचादेखील इशारा दिला जातो. असो. अलिशाने तर जगाचा निरोप घेतला. परंतु आईच्या प्रयत्नाने सर्वांच्या डोळ्यात मात्र अंजन घालण्याचे काम केले आहे. त्यामुळेच एनएचएसने विद्यापीठातील या वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी हे लसीकरण मोफत करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हा आजार संपवण्यासाठी विद्यापीठाच्या प्रशासनाने ऑफ टू युनी अर्थात युनिव्हर्सिटीतून मॅनेंजाइटिसमुक्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...