आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संघाला दहशतवादी संघटना घोषित करण्‍यास तीन भारतीयांची अमेरिकेतील न्यायालयात धाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाला(आरएसएस) दहशतवादी संघटना घोषित करावी यासाठी तीन भारतीयांनी अमेरिकेच्या न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी संघावर जबरदस्त धर्मांतर करण्‍याचा आरोप लावला आहे. त्यांनी शीख अधिकार संघटना शीखस फॉर जस्टिसची(एसएफजे) मदत घेतली आहे. एसएफजे पूर्वीपासून संघाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्‍याचा प्रयत्न चालवला आहे. तिघांनी आपली याचिका न्यायाधीश लॉरा टेलर स्वेन यांच्या न्यायालयात दाखल केला आहे. एसएफजेने म्हटले, शीख समाज संघाच्या 'घर वापसी' कार्यक्रमाने पीडित आहे. पीडितांचे नाव मायकल मसी, हाशिम अली आणि कुलविंदर सिंह अशी आहेत. मायकल ख्रिस्त, हाशिम मुस्लिम आणि कुलविंदर शीख आहे. 2014 मध्‍ये भाजप सत्तेत आल्यानंतर संघ कुटूंबाने जबरदस्तीने हिंदू धर्मांत येण्‍यासाठी धर्मांतर मोहिम उघडली आहे.
अमेरिकेच्या अहवालाचा पुरावा
अमेरिकेच्या कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडमच्या अहवालाचा न्यायालयात पुरावा देण्‍यात आला आहे. अहवालात डिसेंबर 2014 मध्‍ये हिंदू संघटनांनी यूपीत 4 हजार ख्रिश्चिन आणि 1 हजार मुस्लिम कुटूंबांना जबरदस्तीने धर्मांतर करायाची घोषण केली. दुसरीकडे कायदेशीर सल्लागार गुरपतवंत सिंह पन्नू म्हणतात, की अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार ओबामा प्रशासन संघासारख्‍या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावयास कटिबध्‍द आहे.