आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मलाला'ने जीन्स काय घातली, कट्टरपंथींनी केली पॉर्न स्टारशी तुलना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - सामाजिक माध्यम म्हटल्या जाणाऱ्या फेसबूक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर जसा माहितीचा प्रसार केला जात आहे तसाच घृणा आणि फेक न्यूज सुद्धा सर्रास व्हायरल केले जात आहेत. त्याचा बळी काही वेळा प्रतिष्ठित व्यक्ती आणि सिलेब्रिटी तर कधी सामान्य लोक सुद्धा पडतात. अशाच एका पोस्टमुळे नोबेल जिंकलेली पाकिस्तानची मलाला युसूफझाई हिची तुलना काही कट्टरपंथीय थेट पॉर्न स्टारशी करत आहेत. 
 
 
सोशल मीडियावर नुकताच मलाला सारख्या दिसणाऱ्या एका मुलीचा फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये अगदी मलालासारखी दिसणारी मुलगी जीन्समध्ये दिसून येते. ती मलालाच आहे याची शहनिशा अद्याप झालेली नाही. तरीही लोकांनी तिची तुलना थेट पॉर्न स्टार मिआ खलिफाशी केली. काही पाकिस्तानी तिच्या समर्थनातही आले आणि अन्न व वीज संकटात असलेल्या पाकिस्तानात कोणत्या मुद्यांवर चर्चा सुरू आहे याची आठवण करून दिली. 
 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, लोकांनी सोशल मीडियावर दिलेल्या प्रतिक्रिया...
बातम्या आणखी आहेत...