आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

AMAZING : अमेरिकत अशा प्रकारे साजरा होतो Burning Man Festival

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या नेवाडामध्ये एक विचित्र फेस्टीव्हस साजरा केला जातो. ब्लॅक रॉक डेजर्टमध्ये आयोजित या फेस्टीव्हसमध्ये यावर्षी सुमारे 70 हजार जणांनी सहभाग घेतला. याला बर्निंग मॅन फेस्टीव्हल असे म्हटले जाते. वाळवंटाच्या अगदी मध्यभागी हा महोत्सव होत असतो. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्मी असते. पण तसे असले तरीही याठिकाणी हवामान अत्यंत वेगाने बदलत असते. या फेस्टीव्हलमध्ये काही लोक हाफ न्यूड असतात तर काही भुतासारखी वेशभुषा करून येत असतात. यावर्षी आर्ट आणि म्युझिक लव्हर्स मोठ्या संख्येने याठिकाणी पार्टी करण्यासाठी जमले होते.
वाळवंटात अनेकदा मोठी वादळे येत असतात. तेही याठिकाणी सहभागी होणाऱ्यांना सहन करावे लागते. याठिकाणी सहभागी होणाऱ्यांच्या कॉस्च्युममुळेदेखिल या फेस्टीव्हल प्रसिद्ध आहे. त्यासाठी आयोजक आणि पार्टीमध्ये सहभागी होणारेही चांगलीच तयारी करत असतात. रिपोर्टनुसार 1986 पासून दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जातो.

पुढील स्लाइड्सवर पाहा, फेस्टीव्हलचे आणखी काही PHOTOS...