सोमवारी (ता. 12) पंतप्रधान
नरेंद्र मोदी जर्मनीच्या दौ-यावर होते. त्यांनी जर्मनीच्या चान्सलर अंजेला मर्केलसह हॅनोव्हर व्यापार प्रदर्शनात भारतीय स्टॉलचे उद्घाटन केले. या दरम्यान भारतीय कलाकारांनी
आपल्या कलेची उत्कृष्ट सादरीकरण केले होते.मात्र याबाबत माध्यमात बातमी आली नव्हती. आता या कार्यक्रमाची व्हिडिओ प्रसिध्द झाला आहे.
भारतीय संगीत आणि नृत्य कलेचे पंतप्रधान मोदी आणि मर्केल यांच्या प्रमुख उपस्थितीत सादरीकरण केले. या कलाकारांना टाळ्यांच्या गजरात दाद मिळाली. या कार्यक्रमात 'मेक इन इंडिया'चाही प्रभाव दिसला.भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या अनधिकृत
फेसबुक पानावर या कार्यक्रमाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तुम्हीही पाहा उत्कृष्ट कलेचे सादरीकरण.
पुढील स्लाइड्सवर पाहा भारतीय कलाकारांची कलाकारी...