चित्र अशी गोष्ट आहे जी प्रत्येकालाच आवडते. काहींना चित्र काढायला आवडते, तर काहींना चित्र पाहायला आवडते आणि काही कलाकार असतात जे चित्रांमध्ये नवनवे प्रयोग करत असतात. अशीच एक कलाकार आहे एल्सपेथ मॅकलिन (Elspeth McLean). मॅकलिन या ठीपक्यांच्या साह्याने चित्र काढतात. त्यांची ही पध्दत इतकी आगळी वेगळी आहे की, पाहाणारा त्यांचे चित्र पाहातच राहातो. शेहडोहून जास्त प्रकारच्या रंगाच्या शेड्स त्यांच्या चित्रात पाहायला मिळतात. नुकतेच त्यांनी समुद्राच्या तळाशी सापडणाऱ्या दगडांवर काढलेल्या चित्रांचे कलेक्शन पहायला मिळाले. हे चित्र पाहाताना
आपल्याला ते दगडावर काढले आहेत याची जरासुध्दा जाणीव होत नाही. मॅकलिन यांची चित्रे बुद्धीस्ट चित्रकलेला अनुसरून आहेत. या चित्रावरील रंगकाम पाहाताच कोणीही थक्क होईल. हे फार परिश्रमाचे आणि संयमाचे काम आहे. त्यामुळेत त्यांची चित्रे ही जगभर प्रसिध्द आहेत. चला तर मग आपणही घेऊयात त्यांच्या या चित्रांचा अस्वाद...