आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हाइट हाऊसच्या आतही भारत अमेरिका हे उत्तम मित्रच: राज शहा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प याचे महत्वाचे सहकारी व्हाईट हाऊसमधील एक नवे बडे भारतीय प्रस्थ राज शहा यांनी भारतीयांनी ट्रम्प यांच्यावर भरवसा ठेवावा ते नक्कीच भारत व अमेरीकन भारतीयांसाठी फायद्याचे ठरतील असा विश्वास व्यक्त केला. 
 
ट्रम्प यांनी अमेरिकन भारतीय निक्की हेली यांना संयुक्त राष्ट्रसंघात अमेरिकेचे राजदूत म्हणून नेमले. हे कॅबिनेट मंत्री दर्जाचे पद आहे. असे पद प्रथमच  भारतीय अमेरिकनास मिळाले आहे. प्रारंभीच्या टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन मध्ये त्यांनी भारताच्या पंतप्रधानांशी संवाद साधून महत्त्व दिले. व्हाइट हाऊसच्या आतही भारत-अमेरिका हे मित्रच आहेत, असे लक्षात आणून दिले आहे. 

मोदींबरोबर व्हाइट हाऊसमध्ये फोटोची इच्छा : शहा   ओबामांनी बडबड करण्याशिवाय काही केले नाही. ट्रम्प यांची आश्वासने आणि कृती ही तुम्हाला सत्यात उतरलेली काही दिवसांत दिसेलच. शहांंना मोदींच्या अमेरिका भेटीची उत्सुकता आहे. ते व्हाइट हाऊसमध्ये अध्यक्षांच्या कार्यालयाशेजारीच काम करतात. शहा म्हणतात की, मी एक भिंत मुद्दामहूनच उघडी ठेवली आहे. 
 
कोण आहेत राज शहा? 
शहा यांचे वडील १९८० त अमेरिकेत आले. त्यांची बहिणही अमेरीकी विद्यापीठात आहे त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये इंटर्न म्हणून काम केले. व्हाइट हाऊसमध्ये येण्यापूर्वी राज शहा हे रिपब्लिकन पक्षातर्फे विरोधकांवरील विश्लेषण संशोधन समितीचे संचालक होते. निवडणूकीत शहांंनी हिलरींंची  महत्त्वपूर्ण माहिती शोधली. या टीमचे शहा हे कणाच होते. ट्रम्प विषयी ते म्हणतात की, ते अमेरिकन भारतीयांकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या देऊ शकतात.
बातम्या आणखी आहेत...