आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका: गुलामीचे प्रतीक असलेल्या 1500 पुतळ्यांना हटवण्यासाठी निदर्शने, तोडफोड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅरीलँड गर्व्हनरच्या आदेशानुसार शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती रोजर बी यांचा पुतळा हटवण्यात आला. हा पुतळा १४५ वर्षे जुना होता. - Divya Marathi
मॅरीलँड गर्व्हनरच्या आदेशानुसार शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती रोजर बी यांचा पुतळा हटवण्यात आला. हा पुतळा १४५ वर्षे जुना होता.
वॉशिंग्टन- अमेरिकेतील गुलामीच्या प्रथेचे प्रतीक असलेल्या पुतळ्यांना हटवण्यासाठी ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत. अशा पुतळ्यांची तोडफोड केली जात आहे. देशभरातील शाळा, उद्याने, संग्रहालयात असलेल्या पुतळ्यांची संख्या १५०० एवढी आहे. ते कंफेडरेस्ट कालखंडाचे प्रतीक मानले जातात. अकरा राज्यांच्या संघाला अमेरिकेत कंफेडरेस्ट म्हटले जाते. ही राज्ये गुलामी प्रथेचे पुरस्कर्ते होते. हा संघ १८६१ ते १८६५ दरम्यान अस्तित्वात होता. त्या दरम्यान  साडेसात लाखांहून अधिक निष्पाप नागरिकांची हत्या झाली होती. अशा प्रतिकांना हटवण्याची पहिली मागणी शार्लोटविलेमधून झाली.

गोऱ्या समुदायाच्या निदर्शकांनी कंफेडरेस्ट नेते जनरल रॉबर्ट इ ली यांच्या पुतळ्यास हटवण्याची मागणी केली होती. त्या मागणी विरोधासाठी दुसऱ्या गटाने रॅली काढली होती. त्यात एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर रॉबर्ट इ ली व स्टोनवाल जॅक्स यांच्या पुतळ्यांची तोडफोड करण्यात आली.

इतिहास बदलू शकत नाहीत : ट्रम्प
अमेरिकेच्या इतिहासाला विखुरल्याचे पाहून दु:खी आहे. आपण इतिहासाला बदलू शकत नाहीत. त्यातून धडा घेऊ शकतो.
- डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका.

हिंसक इतिहासासाठी जागा नाही : नॅन्सी
अमेरिकेच्या संसद परिसरात किंवा देशातील प्रतिष्ठित ठिकाणांवर कंफेडरन्सीच्या लोकांच्या हिंसक कट्टरतेचे गुणगान करण्यासाठी स्थान नाही.
- नॅन्सी पेलोसी, खासदार, डेमोक्रॅटिक.
 
६० टक्के लोकांना वाटते पुतळे हटवू नयेत
एनपीआर / पीबीएस न्यूज हॉवरच्या पाहणीनुसार देशातील ६० टक्के लोक पुतळे हटवण्याच्या विरोधात आहेत. हे आपल्या भूतकाळाचे प्रतीक आहेत. शार्लोटविलेमधील सुमारे ६२ टक्के लोकांच्या मते पुतळे हटवले जाऊ नयेत. केवळ २७ टक्क्यांच्या मते उद्याने, शाळा तसेच संसदेच्या परिसरात त्यांना स्थान दिले जाऊ नये. अमेरिकेच्या संसद परिसरातील स्टॅच्युरी कलेक्शन हॉलमध्ये १२ कंफेडरेट राज्यांतील पुतळ्यांचा संग्रह आहे. १७ लष्करी तळांना कंफेडरेट सैन्य अधिकाऱ्यांची नावे आहेत.
बातम्या आणखी आहेत...