आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायड्रोजन बॉम्ब चाचणीचा सुरक्षेला धोका : शिंजो अॅबे; जगभरामध्ये संताप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाचणीची बातमी ऐकण्यासाठी टीव्ही संचासमोर बसलेले किम उन. - Divya Marathi
चाचणीची बातमी ऐकण्यासाठी टीव्ही संचासमोर बसलेले किम उन.
वॉशिंग्टन / बीजिंग- उत्तर कोरियाने केलेल्या हायड्रोजन बाॅम्ब चाचणीनंतर अनेक देशांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. हायड्रोजन चाचणी हा राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी म्हटले आहे.

उत्तर कोरियाने चाचणी घेऊन संयुक्त राष्ट्राच्या नियमाचे उल्लंघन केले आहे. परंतु त्यांनी हायड्रोजन चाचणी आडून आण्विक चाचणी घेतली असेल तर हे कृत्य जपानच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारे आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग करण्यात आला आहे, असे पंतप्रधान अॅबे यांनी म्हटले आहे. उत्तर कोरियाच्या कृत्यामुळे आमच्या भविष्याला धोका आहे, असे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क ग्यूएन हेई यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या, उत्तर कोरियाची कृती आंतरराष्ट्रीय शांती आणि स्थैर्याला आव्हान देणारी आहे. त्यामुळे कडक उपाययोजनांची गरज आहे. उत्तर कोरियावर निर्बंध लादण्यात यावेत. उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय दबावाला जुमानता यापूर्वी २००६, २००९, २०१३ मध्ये चाचणी घेतली होती. त्यातून तणाव निर्माण झाला होता.

चीनचाही विरोध
चीन हा उत्तर कोरियाचा महत्त्वाचा मित्र मानला जातो. परंतु हायड्रोजन चाचणीवर चीनने सावध पवित्रा घेत त्यास विरोध केला आहे. हा बेजबाबदारपणा आहे. त्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर विरोधाला सामोरे जावे लागेल. आता यापुढे तरी संकट आेढवेल किंवा परिस्थिती अधिक गंभीर होईल, अशी कृती करणे थांबवले पाहिजे, असा सल्ला चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी दिला.

>उत्तर कोरियाची वागणूक नेहमीच कपटाची राहिली आहे. त्यांच्यामुळे शांतता सुरक्षेला धोका आहे, असे ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री ज्युलिया बिशॉप यांनी म्हटले आहे.

कडक निर्बंधाचा मार्ग मोकळा
उत्तर कोरियावर कडक निर्बंध लावले जाऊ शकतात. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने बैठक बोलावल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तर कोरियाच्या विरोधात संताप आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदाय उत्तर कोरियाची नजीकच्या काळात मोठी कोंडी करू शकते. त्यासाठी निर्बंधाचा पर्याय आहे. उत्तर कोरियावर आर्थिक निर्बंधाबरोबरच इतर स्वरूपाचे निर्बंध लागतील.

भूमिका बदलली नाही
पाश्चात्त्य देशांसह आंतरराष्ट्रीय समुदायाकडून टीका होत असली तरी उत्तर कोरियाने आपली भूमिका योग्य असल्याचा दावा केला आहे. अणु कार्यक्रम कोणत्याही परिस्थितीत थांबवण्यात येणार नाही. अस्त्राचा अगोदर वापर केला जाणार नाही, या भूमिकेत बदल झालेला नाही.

अमेरिका, ब्रिटन, रशियाकडूनही निषेध
अमेरिका आणि ब्रिटनने देखील हायड्रोजन चाचणीला विरोध केला. उत्तर कोरियाच्या चाचणीमुळे प्रादेशिक शांततेला धोका आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. ही चाचणी झाल्यामुळे आगामी काळात उत्तर कोरिया आण्विक चाचणीदेखील घेऊ शकतो, ही सर्वात मोठी भीती आहे, असे रशियाने म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्यावर चिंता व्यक्त केली आहे.
बातम्या आणखी आहेत...