आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 ऑगस्टः अमेरिकेने टाकला होता जापानवर अणूबॉम्ब, मृतदेहांचे लागले होते ढीग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अणूबॉम्ब पडल्यानंतर सर्वत्र जपानी नागरिक पळताना दिसत होते. त्यांचे कपडेही फाटले होते. घालायला दुसरे कपडेही नव्हते. - Divya Marathi
अणूबॉम्ब पडल्यानंतर सर्वत्र जपानी नागरिक पळताना दिसत होते. त्यांचे कपडेही फाटले होते. घालायला दुसरे कपडेही नव्हते.
न्युयॉर्क- 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने जापानच्या हिरोशिमा शहरावर अणूबॉम्ब टाकला होता. त्याच्या महाभयंकर स्फोटात संपूर्ण शहर उद्धवस्त झाले होते. शासकीय आकडेवारीनुसार त्यात सुमारे 1 लाख 40 हजार जपानी नागरिक मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला होता. दोन्ही हल्ल्यात लाखो नागरिक जबर जखमी झाले होते. काहींना अनेक व्याधी जडल्या होत्या तर काहींची स्मृती हरपली होती. तरीही आतापर्यंत अमेरिकेने जापानची माफी मागितलेली नाही.
या घटनेच्या दिवशी सकाळीच हिरोशिमाच्या लोकांना असे वाटत होते, की लवकरच रात्र होणार आहे. वातावरणात अस्वस्थता होती. या दरम्यान अमेरिकेचे फायटर जेट विमान बी-29 ने जमिनीपासून सुमारे 31 हजार फुट उंचीवरुन अणूबॉम्ब खाली सोडला. जरा वेळाने जमिनीतून धुराचा आणि आगीचा लोळ उठला. त्याने संपूर्ण शहराला मरणमिठी मारली.
ऑपरेशन 'लिटल बॉय'
या अणुबॉम्ब हल्ल्यांचे सांकेतिक नाव लिटल बॉय असे होते. नाव जरी साधे असले तरी लिटल बॉय जपान आणि माणुसकीला खोल जखम देऊन गेला. लिटल बॉयला दुस-या महायुध्‍दाच्या वेळी अमेरिकेतील मॅनहॅट्टन प्रकल्पांतर्गत लॉस अलामोसमध्‍ये बनवण्‍यात आला होता.
किती पॉवरफुल होता 'लि‍टल बॉय'?
जवळजवळ 4 हजार किलोग्रॅम वजनाच्या या बॉम्बची लांबी तीन मीटर आणि व्यास 71 सेंटिमीटर होता. या बॉम्बने आपली विस्फोटक क्षमता युरेनियम -235 च्या आण्विक विखंडन प्रक्रियेतून प्राप्त केली होती. त्याची विध्‍वंसक क्षमता 13-18 किलोटन टीएनटी (ट्रायनायट्रोटालूईन) च्या बरोबरीची होती.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, हिरोशिमाच्या विध्वंसाचे डोळे उघडणारे फोटो....
बातम्या आणखी आहेत...