आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत माथेफिरूचा गोळीबार, पाच मुलांसह तीन नागरिकांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्युस्टन- अमेरिकेत गोळीबाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. टेक्सासमध्ये एका माथेफिरूने केलेल्या गोळीबारात पाच मुलांसह तीन नागरिकांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिसांसोबत झालेल्या प्रदीर्घ चकमकीनंतर माथेफिरू थेट शरण आला.
शनिवारी रात्री नऊच्या सुमारास एका घरात ही घटना घडली. ४९ वर्षीय व्यक्तीने हे कृत्य केले. टेक्सासमधील एका घरात हा गोळीबार झाला. त्यानंतर पोलिसांनी तिकडे धाव घेतली. पोलिसांनी घराला घेराव घातला. गोळीबार केल्यानंतर काही वेळ किरकोळ धुमश्चक्री उडाली. त्यानंतर आरोपीने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. पोलिसांनी आठ मृतदेह ताब्यात घेतले. घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही, असे पोलिसांनी सांगितले.