आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार, १४ ठार, हल्लेखोरांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन फ्रान्सिस्को- अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतात गुरुवारी अपंगांसाठीच्या एका समाजकेंद्रावर एका दांपत्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १४ जण ठार, तर १७ जण जखमी झाले. नाताळनिमित्त येथे पार्टी सुरू असतानाच हा हल्ला झाला. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कारवाईत हल्लेखोर दांपत्यही ठार झाले असून ते मूळ पाकिस्तानी वंशाचे अमेरिकी नागरिक असल्याचे तपासात निष्पन्न झाले. इस्लामिक स्टेट या सिरियातील दहशतवादी संघटनेने जगभर चालवलेल्या हल्ल्यांच्या धर्तीवरच हा हल्ला असल्याने अमेरिकी धास्तावले आहेत.

या हल्ल्यानंतर हल्लेखोर दांपत्य एका वाहनातून पसार झाले. मात्र, नंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना गोळ्या घातल्या. तपासात हे दांपत्य मूळ पाकिस्तानी वंशाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. सय्यद रिझवान फारुख (२८) व तश्फीन मलिक (२७) अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते, असा दावा एका टि्वटमध्ये करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आपल्या सहा महिन्यांच्या बाळास घरी सोडून हे दोघे हल्ला करण्यासाठी आले होते. दरम्यान, आणखी एक हल्लेखोर फरार असल्याचे सांगितले
जात आहे. लॉस एंजलिसपासून सुमारे १०० किमी दूर सॅन बर्नांडिनो भागात हा हल्ला झाला. लॉस एंजलिस टाइम्सने तपास संस्थांच्या हवाल्याने म्हटले की, एक हल्लेखोर याच पार्टीत सहभागी झालेला होता. मात्र, त्याची बाचाबाची झाली.
पुढील स्‍लाइडवर वाचा सहा महिन्यांचे मूल घरी ठेवून आले होते हल्लेखोर दांपत्य
बातम्या आणखी आहेत...