आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियाने अण्वस्त्र चाचणी घेतल्यास हल्ला करणार अमेरिका, गुप्तचर अधिकाऱ्यांचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
...तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उत्तर कोरियावर प्रिएम्पटीव मिसाईल हल्ले करण्याचे आदेश देतील - Divya Marathi
...तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उत्तर कोरियावर प्रिएम्पटीव मिसाईल हल्ले करण्याचे आदेश देतील
वॉशिंग्टन - जगातील सर्वात एक्कलकोंडा राष्ट्र उत्तर कोरिया अण्वस्त्र चाचणी घेत असेल तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यावर पारंपारिक शस्त्रांनी हल्ला करण्याचे आदेश देतील असा दावा वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्यांनी केला. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन लवकरच 6 वी अण्वस्त्र चाचणी घेणार असे वृत्त असतानाच अधिकाऱ्याने हा दावा केला.
 
उत्तर कोरियाचे पहिले हुकूमशहा आणि विद्यमान हुकूमशहा किम जोंग उन यांचे आजोबा किम इल संग यांच्या जयंतीनिमित्त उत्तर कोरियात 15 एप्रिल रोजी 'डे ऑफ द सन' साजरा केल्या जातो. याच दिवशी उत्तर कोरिया सहावी अण्वस्त्र चाचणी घेणार असा इशारा अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपानसह विविध देशांच्या गुप्तचर संस्थांनी दिला. त्यावर नाव न सांगण्याच्या अटीवर अमेरिकेचे वरिष्ठ गुप्तचर अधिकारी म्हणाले..
 
- उत्तर कोरिया सहावी अण्वस्त्र चाचणी घेण्याचा निर्णय बदलणार नसेल तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या देशावर प्रिएम्पटीव मिसाईल हल्ले करण्याचे आदेश देतील. एखाद्या शत्रूने हल्ला करण्यापूर्वीच त्याला चकित करण्यासाठी केल्या जाणाऱ्या हल्ल्यांना प्रिएम्पटीव हल्ले संबोधले जाते. अमेरिकेने यापूर्वीच आपला मित्र राष्ट्र दक्षिण कोरियाच्या संरक्षणासाठी कोरियन बेटावर टोमाहॉक मिसाईल तैनात केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष संभावित हल्ल्यात त्यांचाही वापर करू शकतात.
 
दक्षिण कोरियासाठी घातक
अमेरिकेने उत्तर कोरियावर हवाई हल्ले किंवा मिसाईल हल्ले केल्यास हुकूमशहा किम जोंग उनचे सैनिक दक्षिण कोरियावर हल्ला करू शकतो. त्यामुळे, अमेरिकेचा हल्ल्याचा निर्णय दक्षिण कोरियासाठी घातक ठरेल असा इशारा अमेरिकेतील थिंक टँकने दिला. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...