आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेने अतिरेक्यांऐवजी ६२ सिरियन जवानांना ठार मारले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - आघाडी फौजांनी सिरियात आयएस अतिरेक्यांऐवजी सिरिया लष्करातील ६२ जवानांना ठार केल्याची कबुली अमेरिकेने रविवारी दिली. त्याआधी रशियाने अमेरिकेवर याबाबत आरोप केला होता. मात्र, अमेरिकेने त्यांना खोटे ठरवले होते. अमेरिकेने आता चुकीबद्दल खेद व्यक्त केला आहे. रशियाने या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली आहे.

या हल्ल्यात सिरियाचे १०० पेक्षा जास्त सैनिक जखमी झाले आहेत. सिरियातील मानवी हक्क देखरेख संघटनेने मृत सैनिकांची संख्या ८३ असल्याचे सांगितले आहे. अमेरिकी संरक्षण िवभाग पेंटागॉनने म्हटले की, आघाडी फौजांनी आयएस अतिरेक्यांचा तळ समजून हवाई हल्ला केला होता. मात्र, तिथे सिरियन लष्कर अतिरेक्यांना हुसकावून लावल्यानंतर थांबले होते ही माहिती हल्ला करणाऱ्या तुकडीला दिली नव्हती.
पेंटागॉनचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, सिरियाच्या पूर्वेकडील देर एजोर विमानतळावर अमेरिकी आघाडी सेनेचा हा पहिला हल्ला आहे. मात्र, तिथे सिरियाचे जवान असल्याची माहिती मिळताच तत्काळ हल्ला रोखण्यात आला. दुसरीकडे, रशियाने म्हटले की, अमेरिकेच्या या हल्ल्यामुळे अतिरेक्यांना पुढे चाल करण्याची संधी मिळाली असून अशा पद्धतीने अमेरिकेने अतिरेक्यांची मदत केली आहे.

युद्धबंदी संकटात
अनेक महिन्यांच्या चर्चेअंती ९ सप्टेंबर रोजी रशिया आणि अमेरिकेत युद्धबंदीचा करार झाला होता. करार सोमवारपासूनच लागू झाला आहे. सिरियन सैनिकांवर हवाई हल्ला करून त्यात अडचण निर्माण झाली आहे. अमेरिका अतिरेक्यांना मदत करत असल्याचे यातून सिद्ध होत असल्याचे सिरियाने म्हटले आहे.

अतिरेक्यांनी पाडले लष्कराचे विमान
दरम्यान, दहशतवादी संघटना आयएसने रविवारी सिरियन लष्कराचे एक लढाऊ विमान पाडले. जेबेल थारडा भागात झालेल्या या हल्ल्यात वैमानिकाचा मृत्यू झाला.
बातम्या आणखी आहेत...