आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना न्यायालयाचा झटका; अवैधरीत्या राहत असलेल्या विदेशींमुळे निधी अडवला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्याच एका निर्णयाप्रकरणी मोठा झटका बसला आहे. एका फेडरल न्यायाधीशांनी सेंच्युरी शहरांचा निधी रोखण्याच्या त्यांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या भागात अवैधरीत्या अमेरिकेत आलेले विदेशी नागरिक राहतात. त्यामुळे या भागाचा निधी अडवण्याचे आदेश ट्रम्प यांनी जानेवारी महिन्यात दिले होते. मात्र, त्यांनी राष्ट्राध्यक्षांच्या अधिकार कक्षेबाहेर जाऊन हे प्रशासकीय आदेश जारी केले, असे यूएस डिस्ट्रिक्ट न्यायमूर्ती विल्यम ऑरिक यांनी म्हटले. ट्रम्प यांनी आदेशात म्हटले होते की, ज्या राज्यांमध्ये विदेशी नागरिकांना आपल्याकडे अवैधरीत्या राहू दिले जात आहे. त्यांना यापुढे निधी दिला जाऊ नये. दरम्यान, व्हाइट हाऊसकडून जारी निवेदनात सांगण्यात आले आहे की, सॅन फ्रान्सिस्कोसारख्या सेंच्युरी शहरांत विदेशातून आलेले गुन्हेगार राहतात. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा फेडरल इमिग्रेशन धोरण लागू करण्यात आडकाठी आली आहे. पण आम्ही अन्य कायदेशीर मार्गांचा अवलंब करू.
 
सेंच्युरी शहरे कोणती?
अमेरिकेत सुमारे ३०० शहरांची केंद्र सरकारसोबतच्या संबंधांची मर्यादा निश्चित केलेली आहे. यात अवैधरीत्या अमेरिकेत आलेले कोणतेही विदेशी नागरिक काम करू शकतात. या विदेशी नागरिकांमध्ये वैध पासपोर्ट किंवा अन्य दस्तऐवज नसलेल्यांचाही समावेश अाहे. याच कारणामुळे या शहरांना सेंच्युरी शहर म्हटले जाते.
 
मेक्सिको सीमेवर ‘भिंत’ बांधणारच
अमेरिका - मेक्सिको दरम्यान सीमेवर भिंत बांधलीच जाणार, असा निर्धार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला. आर्थिक व्यवस्था डळमळीत होण्याच्या शक्यतेने अनेक योजना रद्द होऊ शकतात, अशी चर्चा होती. त्यात हा मुद्दाही चर्चेत होता. मात्र, ट्रम्प यांच्या निर्धाराने या चर्चेवर पाणी फेरले गेले आहे. ही भिंत मेक्सिकोकडून होत असलेली अमली पदार्थ व मानवी तस्करी रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. 
 
बातम्या आणखी आहेत...