आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेचा दावा-क्युबात गुप्त ‘हेल्थ अटॅक’मुळे बहिरे होत आहेत आमचे मुत्सद्दी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिका आणि क्युबाच्या नव्या संबंधांत पुन्हा कटुपणा आला आहे. अमेरिकेने दावा केला आहे की, क्युबा आपल्या देशातील अमेरिकी अधिकाऱ्यांना नुकसान पोहोचवत आहे. क्युबा या अधिकाऱ्यांवर आधुनिक सोनिक उपकरणाच्या साहाय्याने ‘हेल्थ अटॅक’ करत आहे. त्यामुळे मुत्सद्द्यांच्या मेंदूला सूज, तीव्र डोकेदुखी, असंतुलन आणि विसरणे अशी लक्षणे दिसत आहेत.  

अमेरिका आणि क्युबा यांच्यात ५५ वर्षांनंतर २०१५ मध्ये पुन्हा राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. तेव्हा ओबामा प्रशासनाने क्युबासोबतच शत्रुत्व विसरून नव्या संबंधांची सुरुवात केली होती. पण दोन वर्षांतच दोघांचेही संबंध उतरणीला लागले आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता हीदर नोर्ट मंगळवारी म्हणाले की, ‘आमच्या आणखी दोन मुत्सद्द्यांच्या आरोग्यावर हल्ला झाला आहे. गेल्या महिन्यांतही असे एक प्रकरण समोर आले होते. क्युबाने दोन वर्षांत आमच्या २१ अधिकाऱ्यांना नुकसान पोहोचवले आहे. ही संख्या जास्तही असू शकते. कारण अशी प्रकरणे उशिरा समजतात.’ हीदर यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी अशी १८ प्रकरणे समोर आल्यानंतर हल्ले थांबले होते, पण क्युबाने पुन्हा सुरुवात केली आहे असे वाटते. त्यामुळे अमेरिका आपल्या कर्मचाऱ्यांची तपासणी सुरूच ठेवेल. या वर्षी या हेल्थ अटॅकमुळे प्रभावित तिघेही मुत्सद्दी होते. याआधी मुत्सद्दी आणि त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान पोहोचवण्यात आले होते. गेल्या वर्षी या घटना समोर आल्यानंतर परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांनी त्याला ‘हेल्थ अटॅक’ असे नाव दिले होते.  हीदर नोर्ट म्हणाले की, या हल्ल्यांच्या कारणांचा शोध लावला जात आहे. सुरुवातीच्या तपासणीत असे आढळले की, या मुत्सद्द्यांवर गुप्त सोनिक हल्ले केले जात आहेत. म्हणजे त्यांना अशा आधुनिक सोनिक उपकरणांद्वारे लक्ष्य केले जात आहे. ज्यांचा आवाज होत नाही, पण ते आपल्या आसपासच्या लोकांच्या कानांवर वाईट परिणाम करते. अशी उपकरणे अमेरिकी मुत्सद्द्यांच्या घराबाहेर किंवा आत सोडली असावीत, असे वाटते. अमेरिकेने क्युबाच्या अटॅकमुळेच आता क्युबाच्या दूतावासात वैद्यकीय अधिकारी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेकडून दोन मुत्सद्द्यांना हाकलले, करालाला नकार  
अमेरिकेने अलीकडेच क्युबाच्या दोन मुत्सद्द्यांना देश सोडण्यास सांगितले. पण त्याचा संबंध ‘हेल्थ अटॅक’शी जोडला नाही. अमेरिकेने म्हटले आहे की, क्युबा आपल्या अधिकाऱ्यांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरला आहे. हा एखाद्या कटाचा भाग असू शकतो. दरम्यान, अमेरिकेच्या मियामी विद्यापीठाने गेल्या आठवड्यातच क्युबाच्या विद्यापीठाशी करार करण्यास नकार दिला होता. इतर अमेरिकी विद्यापीठांनीही असाच निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांतील बिघडत्या संबंधांची परिणाम आहे.   
बातम्या आणखी आहेत...