आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थलांतरित चिमणीच्या घरट्यात दिसली अंडी, अमेरिकेने रोखले ४७२ कोटी रुपयांच्या पुलाचे बांधकाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंड्यांतून पिले बाहेर आल्यानंतर आणि त्यांनी घरटे सोडल्यानंतरच पुलाचे काम सुरू होईल. - Divya Marathi
अंड्यांतून पिले बाहेर आल्यानंतर आणि त्यांनी घरटे सोडल्यानंतरच पुलाचे काम सुरू होईल.
सॅन फ्रान्सिस्को- अमेरिकेत एका स्थलांतरित चिमणीची अंडी वाचवण्यासाठी ४७२ कोटी रुपयांचा प्रकल्प रोखण्यात आला आहे. यात एक पूल तयार होणार आहे. तीन आठवड्यांपूर्वीच बांधकाम सुरू होणार होते; पण आता या अंड्यांतून पिले बाहेर आल्यानंतर आणि त्यांनी घरटे सोडल्यानंतरच पुलाचे काम सुरू होईल.
  
कॅलिफोर्नियाच्या सॅन फ्रान्सिस्कोपासून सुमारे ५० किमीवर रिचमंड-सेन राफेल पूल आहे. तो शहराचा पूर्व भाग पश्चिमेला जोडतो. ८.८५ किमी लांबीच्या या पुलाला आणखी एक लेन जोडायची आहे. त्याचबरोबर काही सुविधा सुरू करायच्या आहेत. त्यासाठी सुमारे ४७२ कोटी रुपयांचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. बांधकाम सुरू करण्याआधी पुलाच्या मार्गात येणारी २४ झाडं हटवायची आहेत; पण त्यावरील एका झाडावर अॅन्स हमिंगबर्ड नावाच्या स्थलांतरित पक्ष्याने अंडी दिली आहेत. १५-२० दिवसांत त्यातून पिले बाहेर पडतील. त्यामुळे पक्षी आणि पिलांनी घरटे सोडेपर्यंत प्रकल्प स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहराच्या महानगर वाहतूक आयोगाचे प्रवक्ता रँचलर यांनी सांगितले, ‘चिमणीच्या अंड्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला आहे. या भागातील प्रत्येक प्रकल्पादरम्यान अशीच सावधगिरी बाळगली जात आहे. त्यासाठी कडक निर्देश आहेत.’  

अमेरिकेत अॅन्स हमिंगबर्ड प्रजातीच्या चिमण्या मोठ्या संख्येने आढळतात. त्या खूप लहान आकाराच्या असतात. अमेरिकेच्या दुसऱ्या भागातून कॅलिफोर्नियात येतात. त्यामुळे त्यांना स्थलांतरित पक्षी मानले जाते. अमेरिकेत स्थलांतरित कायद्यानुसारही या पक्ष्यांना सुरक्षा मिळाली आहे.  
 
पुढील स्लाइडवर पाहा अॅन्स हमिंगबर्ड चिमणी...
बातम्या आणखी आहेत...