आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतावर दहशतवादी हल्ला झाल्यास युद्धाची भिती, अमेरिकाचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेचे उप परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन. - Divya Marathi
अमेरिकेचे उप परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन.
अमेरिकेने पाकिस्तानला अत्यंत तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. अमेरिकेचे उप परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन मंगळवारी म्हणाले की, पाकिस्तानने तालिबान आणि लश्कर-ए-तोयबा सारख्या दहशतवादी संघटनांमध्ये फरक करायला नको. मग तो गट पाकिस्तानात असो की बाहेर. तसेच भारतात जर दहशतवादी हल्ला झाला तर दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याचा इशारावजा भिती व्यक्त केली आहे.

दहशतवाद्यांमध्ये फरक नको
ब्लिंकन यांच्या मते दहशतवादी गटांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदाभेद करता कामा नये. दहशतवादी केवळ दहशतवादी असतात. मग ते पाकिस्तानचे असो की, हक्कानी नेटवर्कचे. ब्लिंकन यांनी पाकिस्तानचे आर्मी चीफ राहील शरीफ यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. ब्लिंकन म्हणाले की, सरकारने वक्तव्यावर विचार करायला हवा.

आर्मी चीफ यांचे वक्तव्य...
पाक आर्मी चीफ जनरल राहील शरीफ म्हणाले होते की, कोणत्याही दहशतवादी संघटनांमध्ये भेदभाव करता येणार नाही. मग ते तालिबान असो की लश्कर ए तोयबा.

दहशतवाद्यांकडून धोका...
ब्लिंकन दोन दिवसांत्या भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. ब्लिंकन यांच्या मते अमेरिका पाकिस्तानला सार्वजनिक, खासदी पद्धतीने वारंवार दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासंदर्भात सूचना देत आहे. या दहशतवादी गटांकडून भारत, अमेरिका आणि अफगाणिस्तानला धोका आहे.

भारतावर हल्ला झाल्यास युद्धाची स्थिती
ब्लिंकंन यांच्या मते भारतात दहशतवादी हल्ला झाल्यास दोन्ही देशांमध्ये युद्ध होऊ शकते. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी आपसांत चर्चा करायला हवी. त्यामुळे तणाव कमी होऊ शकतो. त्यासाठी दोन्ही देशांनी एकमेकांना अधिकाधिक सहकार्यही करायला हवे.

अण्वस्त्रांचा धोका
ब्लिंकन असेही म्हणाले की, दक्षिण आशियामध्ये वाढत्या अण्वस्त्रांच्या संख्येमुळे पाकिस्तानलाच नव्हे तर संपूर्ण जगालाच धोका आहे. पाकिस्तानात मध्यम आणि छोट्या अण्वस्त्रांची संख्या वेगाने वाढली आहे. त्यावर नियंत्रण आणले नाही तर युद्धजन्य स्थिती निर्माण होऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...