आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिनी सागरातील हस्तक्षेप राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका, अमेरिकेचा चीनवर आक्षेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - दक्षिण चिनी सागरातील बेटांवर चीनने काही प्रकल्पांचे बांधकाम हाती घेतले आहे. त्याचे काम वेगाने सुरू आहे. ही बाब अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे व्हाइट हाऊसच्या वतीने बुधवारी स्पष्ट करण्यात आले आहे.

चीनचा दक्षिण सागरी प्रदेश सुरक्षेसाठी किती महत्त्वाचा आहे, हे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी पूर्वीच सांगितले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास दक्षिण चिनी सागरी भागातून व्यापाराचा मार्ग मोकळा करण्यात आल्यास अनेक बाबतीत तो गुंतागुंतीचा होऊ शकतो, असे व्हाइट हाऊसचे सचिव जॉश अर्नेस्ट यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अमेरिका इतर देशांशी चर्चा करणार आहे. अमेरिकेच्या दृष्टीने हा मुद्दा प्राधान्यक्रमात समाविष्ट होतो. चीनच्या लष्करी हालचालींवर अमेरिका बारकाईने नजर ठेवून आहे. सुरक्षेसारख्या मुद्द्यावर चिंता व्यक्त झाल्यानंतर चीनने विशिष्ट गोष्टींवर पारदर्शकतेचे पालन केले पाहिजे, अशी अपेक्षा गृह मंत्रालयाचे प्रवक्ते जेफ राथके यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली. खरे तर चीनला शांतता आणि स्थैर्याच्या दृष्टीने लष्करी शक्तीचा वापर करण्यास आमची हरकत नाही. अशा प्रकारे मर्यादित वापर झाल्याचा त्याचा आशिया-प्रशांत प्रदेशाला फायदाच होईल, असे राथके यांनी म्हटले आहे.

वाद काय आहे ?
दक्षिण चिनी सागरी क्षेत्रातील सुमारे ३० लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळ प्रदेशावर अनेक देशांनी आपला दावा सांगितला आहे. त्यात अनेक बेटांचाही समावेश होतो. तैवान, चीन, ब्रुनेई, मलेशिया, व्हिएतनाम, फिलिपाइन्स या देशांनी काही समान बेटांवर आपला दावा सांगितला आहे. त्यातून वाद निर्माण झाला आहे. चीनने तर पुढे जाऊन काही बेटांवर बांधकाम करण्यास सुरुवात केली. लष्करी तळदेखील निर्माण केले.

निसरडे तेल?
या सागरी क्षेत्रात मोठी खनिज आणि सागरी संपत्ती आहे. तेल, मत्स्य उद्योगासाठी हा प्रदेश महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे अनेक देश या प्रदेशावर आपला ताबा असल्याचा दावा करतात. त्याशिवाय हा आंतरराष्ट्रीय सागरी मार्ग म्हणूनदेखील अत्यंत महत्त्वाचा. तो आपल्या ताब्यात कसा राहील, यासाठी हे देश परस्परांवर कुरघोडीचा प्रयत्न करतात. तेलसाठ्यांवरून आता या देशांत तणाव निर्माण होऊ लागला आहे.

पाकिस्तान अनेक इस्लामिक दहशतवादी गटांसाठी ‘स्वर्ग’
पाकिस्तान हा दहशतवाद्यांच्या अनेक संघटनांसाठी स्वर्गासमान बनला आहे, असे अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या अहवालातून एक प्रकारे भारताच्या भूमिकेलाच दुजाेरा मिळाला आहे, असे म्हणावे लागेल. पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी संघटनांना आश्रय मिळाला आहे. त्यामुळे सीमापार दहशतवाद, हिंसाचार, घुसखोरी आणि युद्ध लादण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्याचा फटका शेजारी असलेल्या भारताला बसत आहे. त्यातून संघर्षाची स्थिती निर्माण होऊ लागली आहे, असे काँग्रेसच्या १४ मे रोजी मांडण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...