आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America Will Take Action Against Indian Students

तीनशेवर भारतीय विद्यार्थ्यांवर अमेरिका करणार कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिका ३०० पेक्षा जास्त भारतीय विद्यार्थ्यांच्या विरोधात कडक कारवाई करणार आहे. त्यापैकी बहुतांश विद्यार्थी वैध व्हिसावर अमेरिकेत आले होते, पण त्यापैकी काही जण निश्चित कालमर्यादेपेक्षा जास्त काळ राहण्याच्या प्रयत्नात आहेत. या विद्यार्थ्यांची संख्या ३०६ एवढी आहे. होमलँड सिक्युरिटी विभागाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये त्यांना पकडण्यात आले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे उप प्रवक्ता मार्क टोनर यांनी सांगितले की, स्टिंग ऑपरेशनच्या आधारे गेल्या आठवड्यात पकडलेल्या २१ दलालांपैकी ११ जण भारतीय वंशाचे आहेत. जे अवैध पद्धतीने राहण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याविरोधातच कारवाई केली जाईल. वैध पद्धतीने आलेल्या कोणालाही त्रास दिला जाणार नाही. या भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेच्या भारतातील राजकीय मिशनने अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठांत शिक्षण घेण्यासाठी व्हिसा दिला होता.