आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: याच दिवशी अमेरिकेच्या \'लिटिल बॉय\'ने माजवला होता अफाट हिंसाचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
6 ऑगस्ट 1945. त्या दिवशी सकाळ काहीशी वेगळी होती. जपानच्या हिरोशिमा शहरात असे वाटत होते, की लवकरच रात्र होणार आहे. सकाळी सव्वा आठ वाजता लोक दैनंदिन व्यवहारांसाठी घराबाहेर पडले होते. यावेळी अमेरिकेचे बॉम्बर प्लेन बी-29 ने जमिनीपासून सुमारे 31000 फुट उंचीवरुन अणू बॉम्ब टाकला. त्यानंतरचा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. ही घटना मानवी इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिली आहे. 70 वर्षांपूर्वी अमेरिकेने शत्रूत्वाचे अतिशय क्रूर उदाहरण सादर केले होते. हा काळ द्वितिय विश्व युद्धाचा होता. यावेळी कधी काय होईल काही सांगता येत नसे.
ऑपरेशन लिटिल बॉय
हिरोशिमा शहरावर टाकलेल्या अणू बॉम्बचे कोड नेम लिटिल बॉय होते. मॅनहॅटन प्रोजेक्ट अंतर्गत लॉस अलामोसमध्ये हा बॉम्ब तयार करण्यात आला होता.
लिटिल बॉयची वैशिष्ट्ये
सुमारे 4000 किलोग्रॅम वजनाच्या या बॉम्बची लांबी तीन मीटर आणि व्यास 71 सेंटिमिटर होता. यूरेनियम -235 च्या न्यूक्लियर फिशन प्रोसेसच्या (नाभिकीय विखंडन प्रक्रिया) माध्यमातून बॉम्बची स्फोटक क्षमता तयार करण्यात आली होती. याची विध्वंस क्षमता 13-18 किलोटन टीएनटीच्या (ट्राइनाइट्रोटालुइन) बरोबर होती.
हल्ल्यात लाखो लोकांचा गेला जीव
जपानी सरकारच्या आकडेवारीनुसार 1,18,661 लोक या अणू हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर ही संख्या वाढली. या हल्ल्यात हिरोशिमाच्या एकूण तीन लाख 50 हजार लोकसंख्येपैकी एक लाख 40 हजार लोक मारले गेले होते. बॉम्ब खाली पडल्यानंतर लगेच 70 हजार लोक मृत्युमुखी पडले होते. रेडिएशनने पीडित 70 हजार लोकांनी 1950 पर्यंत जीव सोडला.
पुढील स्लाईडवर बघा, हिरोशिमावर झालेल्या हल्ल्यानंतरचे विदारक फोटो...
बातम्या आणखी आहेत...