आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन हवाई हल्ल्यांत १० अफगाण सैनिक ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुल-ए. आलम (अफगाणिस्तान)- तालिबान व्याप्त काबूलच्या दक्षिण प्रांतात अमेरिकन हवाई हल्ल्यांत १० अफगाण सैनिकांचा बळी गेल्याचे अफगाणिस्तानच्या संरक्षण सूत्रांनी सांगितले. तालिबान्यांवर केलेल्या आक्रमणात अफगाण नागरिक व सैन्याला धोका निर्माण होत असल्याचे अफगाणच्या अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. डिसेंबरमध्ये नाटो फौजांनी केलेल्या हल्ल्यांतही निरपराध नागरिक ठार झाले होते. सोमवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास २ अमेरिकन हेलिकॉप्टरने बराकी बराक जिल्ह्यातील चेकपाॅइंटला लक्ष्य केल्याचे जिल्हा गव्हर्नर मोहंमद रहिम अमीन यांनी सांगितले. यात १० अफगाण सैनिक मारले गेले. ४ सैनिक गंभीर जखमी आहेत.

दहशतवादी कारवायांच्या संशयावरून करण्यात येणारे हल्ले थांबवावेत. चेक पाॅइंटवर अफगाण ध्वज फडकत असतानाही अमेरिकेने हवाई हल्ले का केले? असा प्रश्न अमीन यांनी उपस्थित केला आहे. डिसेंबरनंतर नाटोने सैन्य काढून घेतले होते. मात्र, प्रशिक्षणासाठी अद्यापही नाटोचे काही सैन्य अफगाणिस्तानात आहे. दरम्यान, दहशतवादाविरुद्धच्या लढ्यामध्ये नागरिक व सैनिकांचे प्राण जाण्यास तालिबान जबाबदार असल्याचे संयुक्त राष्ट्रांची अाकडेवारी सांगते. गेल्या ६ महिन्यांत तालिबानी व सुरक्षा रक्षकांदरम्यान झालेल्या चकमकींत १ हजार अफगाण नागरिकांचा बळी गेला आहे.
बातम्या आणखी आहेत...