आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

US मधील घटना: डेटिंग साईटवर शोधलेला 69 वर्षीय पती निघाला \'तिचा\' सख्खा आजोबा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील 24 वर्षीय एका तरूणीने 69 वर्षाच्या कोट्याधीश वृद्धाशी लग्न केले खरं पण त्यानंतर तीन महिन्यांनी तो तिचा सख्खा आजोबा असल्याचे समोर आले आहे. - Divya Marathi
अमेरिकेतील 24 वर्षीय एका तरूणीने 69 वर्षाच्या कोट्याधीश वृद्धाशी लग्न केले खरं पण त्यानंतर तीन महिन्यांनी तो तिचा सख्खा आजोबा असल्याचे समोर आले आहे.
फ्लोरिडा- अमेरिकेतील 24 वर्षीय एका तरूणीने 69 वर्षाच्या कोट्याधीश वृद्धाशी लग्न केले खरं पण त्यानंतर तीन महिन्यांनी तो तिचा सख्खा आजोबा असल्याचे समोर आले आहे. लग्नानंतर तीन महिन्यांनी हे जोडपे जेव्हा घरातील जुना फोटो अल्बम पाहत होते तेव्हा ही धक्कादायक बाब समोर आली. फोटोत आपल्या पतीसमवेत आपलेच वडील आहेत हे लक्षात आल्यावर त्या तरूणीला धक्का बसला. मात्र, या धक्क्यातून ती तरूणी आता सावरली आहे. तसेच आजोबा असलेल्या पतीसमवेतचा आयुष्यभर राहण्याचा निर्णय घेतला आहे. ते दोघेही एकमेंकांना घटस्फोट देणार नसल्याचे दोघांनी सांगितले.
फ्लोरिडा राज्यातील ही तरूणी गेल्या दोन वर्षापासून या कोट्याधीश वृद्धासमवेत लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. एका विवाहविषयक संकेतस्थळाच्या (मॅट्रिमोनियल साईट) माध्यमातून त्याची भेट झाली होती. तीन महिन्यापूर्वी त्यांनी लग्न केले. लग्नानंतर ते मियामी शहरात शिफ्ट झाले. त्याचवेळी वृद्ध पतीने त्याच्या कुटुंबाची माहिती नवी पत्नी असलेल्या 24 वर्षीय दिली व जुने फोटो अल्बम दाखवले. त्या वेळी पतीचा मुलगा आपले वडिल असल्याचे तरूणीच्या लक्षात आले. फोटो पाहून बसला धक्का...
- एके दिवशी पतीने आपण जुना फोटो एल्बम पाहूया असे सांगितले. पत्नीने होकार दिला. अल्बममध्ये पतीच्या पहिल्या पत्नीपासून जन्मलेल्या मुलांचे फोटो होते. ज्यांच्यापासून तो अनेक वर्षापुर्वी तुटला होता.
- या दरम्यान पत्नीची नजर एका फोटोवर गेली. यात पतीसमवेत एक व्यक्ती होता. तिने पतीला विचारले की ही व्यक्ती कोण आहे? पती म्हणाला, हा तर पहिल्या पत्नीपासून झालेला माझा मोठा मुलगा आहे.
- हे ऐकताच तिला प्रचंड धक्का बसला. तिने इतर फोटो पाहिले. तिची खात्री झाली की ती व्यक्ती माझे वडिलच आहेत व आताचे पती हे माझे सख्खे आजोबा आहेत.
प्रेग्नंट राहिल्याने वडिलांनी हाकलून दिले-
- पत्नी म्हणते, मी हायस्कूलमध्ये शिकत होते. तेव्हा माझे एका मुलासमवेत अफेयर होते आणि त्याच्यापासून मी प्रेग्नंट बनली. ही बाब मी माझ्या वडिलांना सांगितली त्यानंतर त्यांनी मला घराबाहेर काढले.
- ''तेव्हापासून मी माझ्या मुलासमवेत जॅक्सनविले येथे एकटीच राहू लागले. माझा व मुलाचा खर्च भागविण्यासाठी मी एका क्लबमध्ये डान्सर म्हणून काम करू लागली.
- ''जेव्हा अल्बममध्ये मी माझ्या वडिलांचा फोटो पाहिला तेव्हा मी खूपच निराश झाले. मात्र, नंतर माझ्या लक्षात आले की, आमचे नाते तर खूपच घट्ट बनले आहे.
- अशावेळी या नात्यापासून दूर पळणे किंवा घटस्फोट घेणे हा काही पर्याय होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
वृद्धाचे आहे तिसरे लग्न, लॉटरी जिंकल्याने बनला करोडपती-
- वृद्ध पती म्हणाला, हे माझे तिसरे लग्न आहे. दुसरे लग्न 2009 साली आर्थिक तंगीमुळे तुटले होते. यानंतर मी लॉटरी खेळायला लागलो. दोन वर्षापूर्वी मला एकेदिवशी खूप मोठी लॉटरी लागली आणि मी करोडपती झालो.
- ''तिसरी पत्नीशी माझी मुलाखत डेटिंग वेबसाईटद्वारे झाली होती. तसे तर वेबसाईटवर मला अनेक तरूणी भेटल्या. मात्र, माझी झालेली नवी बायको सर्वात खास वाटली.
- ''मी तिचा प्रोफाईल फोटो पाहिला तेव्हा तो ओळखीचा वाटला. पण त्यावेळी आणि नंतर तिला भेटल्यानंतरही कळाले नाही की ती इतकी मला फॅमिलीयर का वाटत होती.
- ''अनेकदा तिच्यासमवेत मी बाहेर फिरायला गेलो. मात्र कधीच मला कळाले नाही किंवा समजले नाही ती माझी नात आहे.
- ''दोन लग्न यापूर्वीच माझी तुटली आहेत. आता मला तिसरे लग्न तोडायचे नाही. मी तिला 2015 च्या न्यू ईयरला प्रपोज केले होते. तेव्हापासून आम्ही एकत्र राहत आहे.
- ''आता आम्ही नव्या नात्याकडे पाहून जगतो. आम्ही खूप आनंदी आहोत. प्रत्येक कपल वेगळे आणि खास असते. आमचे नातेही तेवढेच वेगळे आणि पवित्र आहे.
- दरम्यान, या जोडप्याने आपले नाव जाहीर करण्यास नकार दिला.
पुढे स्लाईडद्वारे आणखी वाचा, या अनोख्या नात्याबाबत....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...