आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांच्या कार्यक्षमतेविषयी अमेरिकन नागरिक साशंक, उत्तर कोरियाच्या युद्ध प्राबल्याविषयी चिंता नसल्याचे ट्रम्प यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २० जानेवारी रोजी पदाची शपथ ग्रहण करतील. त्यांच्या हाती सत्तासूत्रे येण्यास अवघा काही दिवसांचा काळ शिल्लक असतानाच अमेरिकन नागरिकांना त्यांच्या कार्यक्षमतेवर शंका असल्याचे नव्या जनमत चाचणीत दिसून आले. ते लोकप्रिय नेते नसल्याचा दावा यात करण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय संबंध, जागतिक संघर्ष, सैनिकी बळाचा वापर यावर त्यांची पकड मजबूत नसल्याचे यात म्हटले आहे. त्यांच्या कार्यकाळात महत्त्वाचे घोटाळे नियंत्रणात येतील, असेही जनतेला आता वाटत नाही. दर १० पैकी ७ अमेरिकन नागरिकांना बराक आेबामांवर विश्वास होता. जॉर्ज डब्ल्यू बुश, बिल  क्लिंटन यांचीही बाजू विश्वासाच्या पातळीवर मजबूत होती. 
 
४६% उत्तरदात्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर विश्वास असल्याचे सांगितले. ४७% नागरिकांना त्यांची सैन्यावर पकड मजबूत राहील असे सांगितले. ४४% लोकांना ते घोटाळ्यांना नियंत्रित करतील असे वाटते. गॅलप पोलची ही आकडेवारी आहे. लोकप्रतिनिधिगृहात त्यांचा वावर आत्मविश्वासपूर्ण राहील, असे ६०% अमेरिकनांना वाटते. आर्थिक बाबी प्रभावीपणे हाताळतील असे ५९% लोकांचे मत आहे. परराष्ट्र संबंध हिताचे असतील असे ५५% लोकांचे म्हणणे आहे. ५३% लोकांना त्यांची प्रशासनावर पकड मजबूत असेल असे वाटते. गॅलप सर्व्हेचे विश्लेषक जेफ्री एम. जोन्स यांनी ही टक्केवारी सादर केली.  : चीन व अमेरिकेचे व्यापारी संबंध पाहता चीन उत्तर कोरियाला मदत करूच शकत नाही, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. 

कोरियाच्या क्षेपणास्त्राची चिंता नाही : ट्रम्प  
नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची झेप अमेरिकेपर्यंत नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे अमेरिकन नागरिकांनी चिंता करण्याचे कारण नाही, असा विश्वासही त्यांनी दर्शवला. चीनही अण्वस्त्रांच्या स्पर्धेत अमेरिकेला मागे सारू शकणार नाही. नववर्षानिमित्त किम जोंग उन  यांनी अमेरिकेला उद्देशून भाषण केले. उत्तर कोरिया लवकरच आंतरखंडीय क्षेपणास्त्र विकसित करेल, असे जोंग नववर्षाच्या भाषणात म्हणाले. 

पूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांच्या तुलनेत आकडेवारी कमकुवत
यापूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या व्यक्तींच्या तुलनेत ट्रम्प यांचा टक्का घसरल्याचे जेफ्री यांनी सांगितले. ७ ते ११ डिसेंबर दरम्यान गॅलपने हा सर्व्हे केला. टेलिफोन मुलाखती घेण्यात आल्या. अमेरिकेच्या ५० राज्यांतून माहिती संकलन करण्यात आले. मात्र अमेरिकन जनता त्यांच्या कार्यक्षमतेविषयी साशंक असल्याचेच यातून दिसून आले.  

पहिल्याच दिवशी आेबामांचे निर्णय बदलू शकतात
राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे स्विकारताच डोनाल्ड ट्रम्प बराक आेबामांच्या अनेक निर्णयांना बदलू शकतात. २० जानेवारी रोजी ते ४५ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे स्विकारतील. परराष्ट्र, स्थलांतर, ऊर्जा धोरणात मूलभूत बदलांची शक्यता आहे. व्हाइट हाऊसमधील ट्रम्प यांचे प्रवक्ते सी.एन. स्पाइसर यांनी ही माहिती दिली. सायबर हँकिंग प्रकरणी ३५ रशियन राजनयिकांना काढल्याचा निर्णय बदलला जाऊ शकतो. 
बातम्या आणखी आहेत...