आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Colleges Who Wish To Learn Chinese Students Accused Of Fraud

अमेरिकन कॉलेजांत शिकू इच्छिणाऱ्या चिनी विद्यार्थ्यांवर फसवणुकीचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमिली रौहाला - चिनी विद्यार्थिनी शू किंगने अमेरिकन महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी कुठलीच कसर ठेवली नाही. १८ वर्षीय स्केटरने बीजिंगच्या सर्वात उत्तम पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले. तिला गुणही चांगले मिळाले.
आपल्या स्वप्नातील न्यूयॉर्कच्या बरनार्ड महाविद्यालयात जेव्हा ती जाईल तेव्हा तिचे अमेरिकी उच्चार योग्य असावेत, म्हणून तिने तासनतास गॉसिप गर्ल मालिका पाहिली. ११ ऑक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या एसएटी चाचणी परीक्षेसाठी तिने प्रचंड मेहनत घेतली होती. ती निकालाची वाट पाहत होती. शू आणि इतर विद्यार्थ्यांना बराच काळापर्यंत वाट पाहावी लागली.
चाचणी परीक्षा घेणाऱ्या कॉलेज बोर्ड आणि एज्युकेशनल टेस्टिंग सर्व्हिसने ११ ऑक्टोबर रोजी चाचणी देणाऱ्या चिनी आणि दक्षिण कोरियाच्या सर्व विद्यार्थ्यांचे निकाल थांबवले होते. त्यामुळे चाचणीत फसवणूक झाल्याची चर्चा रंगू लागली.टाइमने इ-मेलद्वारे विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ईटीएसचे प्रवक्ता थॉमस एविंग यांनी ऑक्टोबरच्या परीक्षेत काय गडबड झाली हे सांगण्यास नकार दिला. मात्र, त्यांनी उत्तरात म्हटले होते की, वेगवेगळ्या संस्था आणि लोक आपल्या फायद्यासाठी चाचणी परीक्षेची सामग्री अवैधरीत्या मिळवण्यासाठी नवनवीन गोष्टी करत आहेत.
आम्ही सतत बचाव आणि सुरक्षेचे उपाय करत आहोत. यावरून असे स्पष्ट होते की, परीक्षेत गडबड झाली आहे. एसएटी घोटाळा अमेरिकन महाविद्यालयांत विदेशी विद्यार्थी विशेषत: चिनी विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येवर सुरू असलेल्या वादादरम्यान समोर आला. हार्वर्डने २०१८ मध्ये फक्त ५.९ टक्केच अर्जदारांना प्रवेश दिले. चिनी श्रीमंत विद्यार्थी सहज अमेरिकी विद्यार्थ्यांची जागा हडप करत असल्याची भावना अमेरिकन विद्यार्थ्यांमध्ये जोर धरत आहे. शिक्षण विशेषज्ञ योंग झाओ म्हणतात, १९८० मध्ये अशीच दहशत अमेरिकी विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळाली.

चीनमध्ये फसवणुकीने परीक्षा पास करण्याच्या गप्पांमुळे संशय अधिकच वाढला आहे. कॉलेज बोर्डाने एसएटी टेस्ट व इंग्रजी टेस्टमध्ये फसवणुकीचे प्रकार झाल्याचे मान्य केले. प्रमाणपत्राची खोटी नक्कल व खोटे शिफारसपत्र मिळाल्याचे प्रवेश देणारे अधिकारी सांगतात. उदाहरणच द्यायचे झाले तर चाचणी देणाऱ्यांना सिडनीला पाठविण्यात येते. ते चाचणी परीक्षेच्या प्रश्नांना इ-मेलव्दारे सिऑल किंवा हाँगकाँगमध्ये चाचणी परीक्षा देणाऱ्यांना पाठवतात.

घोटाळ्यामुळे अमेरिकन महाविद्यालयांत प्रवेशाची प्रक्रिया अधिकारी व शिक्षावाद्यांसाठी एक आव्हान बनली आहे. महाविद्यालयीन प्रवेश समुपदेशकांच्या राष्ट्रीय संघटनेचे संचालक एडी वेस्ट सांगतात की,चिनी विद्यार्थी शक्यतो गैरमार्ग अवलंबत नाहीत. पीटर ब्रिग्स म्हणतात, सर्व चिनी विद्यार्थ्यांना चुकीचे म्हणणे अयोग्य आहे. चीनमध्ये मुलांना लहानपणापासूनच महाविद्यालयातील प्रवेशासाठी टेस्ट-गावकावसाठी तयार करण्यात येते.
अमेरिकन महाविद्यालये विद्यार्थ्यांची शेरा, निबंध लेखन, शिफारसपत्रांच्या आधारे पारख करतात. राष्ट्रीय परीक्षेतील गुणांच्या आधारे नागरी सेवेत नोकरी मिळवतात. उच्चस्तरावरील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी मोठी किंमत मोजण्यासाठी तयार असलेल्या चिनी कुटुंबांची संख्या वाढत आहे.त्यातच चाचणी परीक्षेची तयारी करून घेणारे शिक्षक आणि संस्थांची भूमिका सुरू होते. न्यूयॉर्कच्या नामचीन कंपन्या या कामासाठी शेकडो डॉलर प्रति तासानुसार शुल्क आकारतात. अनेक शिक्षक कुटुंबांसोबत वर्षापासून काम करत आहेत. ते मुलांना चाचणी परीक्षेच्या तयारीसह अन्य प्रशिक्षणही देतात. त्यांच्यासोबत चीनपासून ते थेट अमेरिकन महाविद्यालयांपर्यंत जातात. यासाठी ते हजारो डॉलरचे शुल्क आकारतात.
चाचणी परीक्षेची तयारी करून घेणारी अमेरिकन फर्म आरबरब्रीजने चीनची प्रवेश मिळवून देणारी फर्म चेजफ्यूचर सोबत भागीदारी करून एक कार्यक्रम तयार केला आहे. तेजीने वाढणाऱ्या या इंडस्ट्रीवर कोणाचेच नियंत्रण नाही. न्यू ओरिएंटल फर्मच्या व्यवस्थापक नेन्सी ली म्हणतात, काही प्रशिक्षक कमी वेळात पैसे कमवण्यासाठी गैरमार्गाचा वापर करतात. ते विद्यार्थ्यांना चिटिंग करण्यात मदत करतात किंवा खोटे दाखले तयार करतात. त्या असे इ-मेल दाखवतात ज्यात घोटाळेबाज आधीच चाचणी परीक्षेचे प्रश्न सोडवणे व चांगले गुण मिळण्याची शाश्वती देतात.

गेल्या वर्षी घोटाळ्याच्या बातम्या समोर आल्यानंतर आरोपांच्या निष्पक्ष तपासणीचे वचन देण्यात आले होते. कॉलेज असोसिएशनच्या नॅशनल असोसिएशनने म्हटले आहे की, कोणत्याही चिनी किंवा दक्षिण कोरियातील विद्यार्थ्यावर अन्याय व्हायला नको. जानेवारी २०१५ मध्ये चाचणी परीक्षा देणाऱ्या अनेक विदेशी विद्यार्थ्यांचे निकाल थांबवण्यात आले आहेत. गोपनीयता व सुरक्षेच्या कमतरतेमुळे असे करावे लागल्याचे इटीएस म्हणते.
५०० अब्ज रुपयांचे उत्पन्न

२०१४ मध्ये अमेरिकेत २ लाख ७०,००० विद्यार्थी शिकत होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे १६ टक्के जास्त आहे. अमेरिकेत विदेशी विद्यार्थ्यांमध्ये ३१ टक्के चिनी आहेत. एकीकडे चीनचे मोठे नेते पाश्चात्त्य शिक्षणाविरोधात बोलतात आणि दुसरीकडे गुपचूप स्वत:च्या मुलांना विदेशात शिक्षणासाठी पाठवतात. राष्ट्रपती शी जिन पिंग यांची मुलगी हार्वर्डमध्ये शिकली आहे. विदेशी विद्यार्थी अधिक पैसे देतात. गेल्या वर्षी चिनी विद्यार्थ्यांकडून अमेरिकेला ८ अब्ज डॉलरचे उत्पन्न मिळाले आहे.
इलेक्ट्रॉनिक गॅझेटद्वारे कॉपी

- चीनमध्ये कॉपीसाठी अत्याधुनिक उपकरणे वापरली जातात. गेल्या वर्षी फार्मसीचे २४४० विद्यार्थी कानात वायरलेस इयरपीस लावून परीक्षा देताना पकडले. काही विद्यार्थी इलेक्ट्रॉिनक इरेजर वापरत होते. परीक्षक त्यांची मदत करत होते.
- चीनमध्ये गावकावमध्ये कॉपीसाठी असा पेन वापरण्यात आला, ज्याव्दारे प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून बाहेर पाठवता येऊ शकत होते. याबाबत वृत्त प्रसारित झाले होते. असे उपकरण ज्यापुढे केजीबी (रशियाची गुप्तहेर संस्था) सुद्धा लाजेल.