आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी काँग्रेस सदस्यांनी गिरवले योगासनाचे धडे !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भारतीय योग आता मजल-दरमजल करत व्हाइट हाऊस, पेंटागॉननंतर थेट अमेरिकेचे सर्वोच्च सभागृह असलेल्या काँग्रेसमध्ये दाखल झाला आहे. २१ जून हा पहिला आंतरराष्ट्रीय योगदिन असेल. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच खासदारांनी "काँग्रेसनल योगी असोसिएशन' स्थापन केले असून या संघटनेचा पहिला योगाभ्यास गेल्या बुधवारी ऐतिहासिक कॅनॉन हाऊसमध्ये पार पडला. यात अनेक दिग्गज काँग्रेस सदस्यांची "योगा ऑन हिल्स' नावाने आयोजित या उपक्रमाला उपस्थिती होती.

टीम रियान, चार्लस रेंजल आणि बार्बारा ली या प्रतिष्ठित सदस्यांनीही या योग शिबिरात हजेरी लावली. भारतीय वकिलातीच्या सहकार्याने या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे यात वृद्ध नागरिक कल्याण संघटनेचे ब्रेनन मुलेनी आणि इराक युद्धात कामगिरी बजावलेले ज्येष्ठ अधिकारी टॉम व्होस यांचीही उपस्थिती होती. या शिबिरात काँग्रेसच्या ६० सदस्य व अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे शिबिरानंतर या प्रत्येकांनी योगासनामुळे आपले मन उत्साही व आनंदी झाल्याचे तसेच एकाग्रतेमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदवले.

भारतीय योगाची अशीही भरारी
भारतात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारने संयुक्त राष्ट्रसंघात पाठपुरावा केला व २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून राष्ट्रसंघाची मान्यता मिळवली. यामुळे भारतीय योग आता अधिकृतरीत्या जगभर पोहाेचला आहे.

अमेरिकेत तणाव हीच समस्या...
अमेरिकी लोकांची खरी समस्या तणाव हीच आहे. योगासनामुळे हा तणाव कमी होत असल्याचे मी अनुभवले. शिवाय एकाग्रता आणि उत्साहही यामुळे भरभरून वाहतो. या योग शिबिराने मला निश्चितपणे लाभ झाला.
टीम रियान, काँग्रेस सदस्य.

हृदयाला भिडले...
मी कोरिया युद्धात सहभाग घेतला आहे. "योगा हॉन हिल्स' ज्येष्ठ नागरिकांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. शिवाय, मानसिक व शारीरिक आरोग्याबाबत योगासनांमुळे नवी जागरूकता निर्माण झाली आहे.
चार्लस बी. रेंजल, काँग्रेस सदस्य.