आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING: अंतराळवीर वडीलांना मुलीने 11 कारच्या मदतीने असा दिला मेसेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पृथ्वीवर असलेली मुलगी अंतराळात असलेल्या वडीलांना कोणत्याही तांत्रिक मदतीशिवाय मेसेज पाठवू शकते, यावर तुमचा विश्वास बसेल. नाही ना... पण हे शक्य झाले आहे. एका मुलीने हुंदाई कंपनीच्या मदतीने असा मेसेज पाठवून विश्वविक्रम केला आहे.
ह्युस्टन येथील रहिवासी 13 वर्षीय मुलगी स्टिफनी हिचे वडील टेरी व्हिट्स इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर कमांडर आहेत. सध्या ते अंतराळात असल्याने कोणत्याही तंत्रज्ञानाची मदत न घेता त्यांना मेसेज पाठविणे अवघड आहे. पण तिने यावर एक शक्कल लढवली. यासाठी तिला हव्या होत्या 11 कार.
यासाठी तिने हुंदाई या कंपनीची मदत घेतली. अमेरिकेतील नवेदा येथील डॅल्मर ड्राय लेकची निवड केली. 11 कारला विशेष पद्धतीने तयार करण्यात आलेले टायर लावण्यात आले. त्यांना तलावावर असा संदेश लिहायचा होता, की तो 249 माईल्सवरुनही स्पष्ट दिसायला हवा.
अंतराळवीर वडील डीएसएलआर कॅमेऱ्याच्या मदतीने पृथ्वीवर लिहिलेला हा मेसेज वाचणार होते. जीपीएसच्या मदतीने जानेवारीत तीन दिवस या घटनेचे छायाचित्रण करण्यात आले. ड्यू फिल्मसचे जॉनी ली यांनी हा प्रकल्प राबवला.
यातून देण्यात आलेला मेसेज होता, की "Steph ❤s you!”
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, तलावाच्या कोरड्या जमिनीवर कसा कोरण्यात आला मेसेज... बघा व्हिडिओ आणि फोटो...
फोटो सौजन्य -HyundaiWorldwide/YouTube
व्हिडिओ सौजन्य -HyundaiWorldwide/YouTube