प्योगाँग - सर्व जगाचा विरोध झुगारून उत्तर कोरियाने हायड्रोजन बाँबची भूमिगत चाचणी घेतली. त्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून, अमेरिकेच्या 'बी-52' या शक्तीशाली लढाऊ विमानाने रविवारी दक्षिण कोरियाच्या आकाशात घिरट्या घातल्या. यातून अमेरिकेने शक्ती प्रदर्शन केल्याची चर्चा आहे.
पाश्चिमात्य प्रसार माध्यमांनुसार, उत्तर कोरियाचा हुकूमशाह किंम जो याने सगळ्या जगाचा विरोध झुगारून हायड्रोजन बाँबची भूमिगत चाचणी घेतली. त्यामुळे उत्तर कोरियाला आपली शक्ती दाखवण्यासाठी अमेरिकेने आपल्या सर्वात शक्तीशाली विमानाने दक्षिण कोरियाच्या आकाशातून घिरट्या घातल्या. आण्विक शस्त्रे वाहून नेणे आणि ते डागण्याची क्षमता या विमानामध्ये आहे.
हायड्रोजन बॉम्ब चाचणीनंतर काय आहे परिस्थिती ...
- सैन्य आणि काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या 'बी-52' या लढाऊ विमानाने कोरियन सीमेमध्ये जावून दक्षिणेकडे जवळपास 72 किमी दूर हवाई दलाच्या तळावरून उड्डाण केली.
- या शक्तीशाली विमानासोबत एक दक्षिण कोरियन आणि एक अमेरिकन जेटही होते.
- यापूर्वी गुरुवारी अमेरिकेच्या टेहहळणी विमानांनी जापान आणि ओकिनाव्हा परिसरातील हवाई दलाच्या तळावरून उड्डाण केली.
- ही उड्डाण म्हणजे दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांचा संयुक्त युद्ध सराव होता, असेही सांगितले जात आहे.
- अमेरिकेच्या या कृत्यावर उत्तर कोरियाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
पुढील स्लाइड्सवर वाचा, अणुबॉम्बपेक्षा हजारपट शक्तिशाली...