आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यक्षपदाच्या दुसऱ्या वादात परस्परांवर वैयक्तिक हल्ले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलांबाबत तुमचे विचार कसे आहेत हे कळाले : हिलरी - Divya Marathi
महिलांबाबत तुमचे विचार कसे आहेत हे कळाले : हिलरी
सेंट लुइस - अमेरिकेत अध्यक्षपद निवडणुकीसाठी सोमवारी झालेल्या दुसऱ्या चर्चेत हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प या दोन उमेदवारांनी परस्परांवर तिखट शब्दांत वैयक्तिक हल्ले केले. ९० मिनिटांपैकी ८० मिनिटे त्यातच गेली. अपेक्षेप्रमाणे ट्रम्प यांच्या अलीकडील व्हिडिओचा मुद्दा उपस्थित झाला. डेमाेक्रॅटिक उमेदवार हिलरी म्हणाल्या की, महिलांबाबत तुमचे विचार किती वाईट आहेत हे नुकत्याच जारी झालेल्या टेपवरून दिसत आहे, तुम्ही अमेरिकेचे अध्यक्ष बनण्यास लायक नाही. ट्रम्प यांनीही त्याला तिखट प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, माझे तर फक्त शब्द होते. तुमच्या पतीने तर कृती केली. तुम्ही बलात्कार करणाऱ्याला वाचवले. मी अध्यक्ष झालो तर तुम्हाला तुरुंगात पाठवेन.

दोन्ही उमेदवारांमध्ये एवढे मतभेद होते की, वाद सुरू होण्याआधी दोघांनी हस्तांदोलनही केले नाही. शेवटी मात्र हस्तांदोलन केले. वाद संपल्यानंतर तत्काळ झालेल्या मतदानात हिलरी क्लिंटन या ट्रम्प यांच्या खूप पुढे आहेत, चर्चेत त्या विजयी झाल्या आहेत, असे सांगण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...