आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हॉली'चे पाय किती लांब-लांब, वाचा कोण आहे ही 4 फूट पायांची तरुणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेत राहणारी हॉली बर्ट आपल्या लांब पायांमुळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. तिची उंची तब्बल 6.5 फूट आहे. मात्र, तिचे पाय चक्क 4.15 फूट लांब आहेत. हॉली बर्ट दुसरीत होती, तेव्हा तिची हाइट आपल्या शिक्षिकेपेक्षा जास्त होती. हॉलीला ही उंची आपल्या आई वडिलांकडून मिळाली आहे. तिच्या वडिलांची हाइट 6.8 फूट आहे. तर तिच्या आईची हाइट सुद्धा तब्बल 6.2 इंच आहे. तिला कित्येक मॉडेलिंग एजंसीजकडून जाहिरातींचे प्रस्ताव येतात. त्यापैकी काही तिने स्वीकारले देखील आहेत. तरीही अवघ्या 20 वर्षांची असलेली हॉली आपल्या प्रसिद्धीला एन्जॉय करत आहे. आपल्या मित्र, मैत्रिणींसोबत जी जेथेही जाते तेथे लोक तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी उत्सूक असतात. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, हॉली बर्टचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...