आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळात अमेरिकेचे हेलिकॉप्टर बेपत्ता; जपानलाही पुन्हा भूकंपाचा तीव्र धक्का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू/ नवी दिल्ली- नेपाळमध्ये भूकंप्रगस्तांना मदत करण्यासाठी व त्यांच्यासाठी अन्नधान्य घेऊन जात असलेले अमेरिकन लष्कराचे एक हेलिकॉप्टर बुधवारी बेपत्ता झाले. हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची भीती आहे. यात सहा विदेशी नागरीक व दोन नेपाळी नागरिक होते. अमेरिकन लष्कराचे कर्नल स्टीव्ह वॉरेन यांनी दिलेल्या माहितीनुसार बेपत्ता होण्याआधी चालक दलाचे सदस्य इंधनाच्या समस्येवर चर्चा करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर त्याचा संपर्क तुटला.त्याचा शोध घेतला जात आहे. कर्नल वॉरेन यांनी सांगितले की, तीन लष्करी अधिकाऱ्यांनी व्ही- २२ रोटर विमानाच्या मदतीने ९० मिनिटे हेेलिकॉप्टरचा शोध घेतला. परंतु त्याचा शोध लागू शकला नाही. त्यानंतर खराब हवामानामुळे तपास थांबवण्यात आला.
दरम्यान, बुधवारी नेपाळसह पूर्व जपानमध्येही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. परंतु त्यात जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. अमेरिकन भूगर्भ शास्त्रज्ञांच्या सर्वेक्षणानुसार या भूकंपाची तीव्रता ६. ८ इतकी नोंदवली गेली. त्याचा केंद्रबिंदू टाेकियोपासून ११९ किलोमीटर दूरवर दक्षिण - पूर्वेला ३९ किलोमीटर खाली होती. भूकंपानंतर सुनामी िकंवा इतर कुठल्या धोक्याचा इशारा जारी करण्यात आलेला नाही. नेपाळमध्ये मंगळवारी ७. ३ रिश्टर स्केलचा भूकंप आल्यानंतर बुधवारी दुपारी २. ५५ मिनिटांनी पुन्हा तीव्र धक्के जाणवले.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार या धक्क्यांची तीव्रता ५. १ इतकी होती.
दरम्यान मंगळवारच्या भूकंपातील मृतांची संख्या ७६ वर पोहोचली आहे.

मोदींकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन
मंगळवारच्या भूकंपात उत्तर भारतात बळींची संख्या १७ वर पोहोचली. त्यात ७७ जण जखमी झाले आहेत. बिहारमध्ये आतापर्यंत २७ धक्क्यांची नोंद झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधानांसोबत बोलणी करून त्यांना सर्वतोपरी मदतीचे अाश्वासन दिले. नेपाळमध्ये गेल्या तीन आठवड्यांत दुसऱ्यांदा तीव्र भूकंपाचा धक्का बसला आहे. २५ एप्रिल रोजीच्या भूकंपातील मृतांची संख्या ८,५०० वर पोहोचली.