आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी कंपनीकडून भारतीय मंत्री, अधिकाऱ्यांना मोठी लाच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- एका अमेरिकी कंपनीने गोवा आणि आसाममधील दोन प्रकल्पाचे काम मिळवण्यासाठी एका मंत्र्यासह काही अधिकाऱ्यांना ९,६७,००० डॉलर्स (सुमारे ६.२० कोटी रुपये) लाच दिली होती. या प्रकरणी कंपनीवर गुन्हेगारी खटला दाखल झाला. काेर्टाने दंडापोटी ठोठावलेली १.७१ कोटी डॉलर्स (सुमारे १.०८ अब्ज रुपये) रक्कम अदा करण्यास कंपनीने होकार दिला आहे.
अमेरिकेच्या कायदा विभागानुसार, न्यूजर्सीमधील बांधकाम व्यवस्थापन कंपनी लुईस बर्जरने गाेवा व गुवाहाटीतील जलविकासासंबंधित दोन प्रमुख प्रकल्प मिळवण्यासाठी ही लाच दिली होती. मात्र,कायदा विभागाने लाच घेणाऱ्या मंत्री व अधिकाऱ्यांची नावे जाहीर केलेली नाहीत.
कंपनीने शुक्रवारी भारत, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि कुवैतमध्ये सरकारी बांधकामांची कंत्राटे घेण्यासाठी अधिकाऱ्यांना लाच देण्याच्या आरोपांच्या प्रकरणी दंड भरण्यास सहमती
दर्शवली आहे. या प्रकरणात कंपनीच्या हिर्श (६१, फिलिपिन्स) आणि जेम्स मॅक्लांग (५९, यूएई) या दोन माजी एक्झक्युटिव्हना लाचखाेरीच्या आराेपांत दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना ५ नोव्हेंबरला शिक्षा सुनावली जाईल. मॅक्लांग हे भारत आणि व्हिएतनाममध्ये कंपनीचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत.
बातम्या आणखी आहेत...