आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS च्या दहशतवाद्यांशी दोन हात करणार, अमेरिकन महिला पोहोचली इराकमध्‍ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना येथे राहणारी सामंथा जॉन्सटन - Divya Marathi
अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना येथे राहणारी सामंथा जॉन्सटन
नॉर्थ कॅरोलिना - अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यात राहणारा सामंथा जॉन्सटन आपल्या तीन लहान मुलांना सोडून इस्लामिक स्टेट(आयएसआयएस) विरुध्‍द लढण्‍यास तयार झाली आहे. या करिता ती अमेरिकेहून इराकमध्‍ये पोहोचली आहे.एमराल्ड आयलंड येथे राहणारी 25 वर्षांची सामंथाने अमेरिकन सैन्यातही काही काळ काम केले आहे. कुर्दीश पेशमर्गा सेनाबरोबर ती काम करत असल्याचे मानले जात आहे. जेथे इराक आणि सीरियामध्‍ये इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांविरुध्‍द कारवाई करणार आहे. आयएसआयएस दहशतवाद्यांविरुध्‍द लढा देणार. कारण ती माझी जबाबदारी आहे, असे सामंथा सांगते.

सामंथा जॉन्सटनला एक पाच वर्षांचा आणि तीन वर्षांचे जुळे मुले आहेत. लष्‍करी गणवेषात रायफल हातात घेतलेला फोटो कुर्दीश वृत्त संकेतस्थळावर प्रसार‍ित झाले आहे. अमेरिकेच्या लष्‍कर नोंदणीनुसार सामंथाने 2008 ते 2011 पर्यंत जिओग्रॉफ‍िकल इंजिनियर म्हणून काम केले होते.सामंथा म्हणते, की विमानतळावर जाताना ती खूप रडली. तिला जायची इच्छा नव्हती. नंतर तिने विचार केला, की जर ती गेली नाही, तर स्वत:ला कधीच माफ करणार नाही.
हे कोणत्याही धर्मासाठी मी करत नाही, असे सामंथाने स्थानिक माध्‍यमांकडे स्पष्‍ट भूमिका केली. लोकांच्या मदती कर‍िता एखादा संस्था सुरु करण्‍याची तिची इच्छा आहे. कारण इराकमधून परतल्यानंतर कुर्दीश समुहासाठी काही तरी करता येईल. ती नेहमी आपल्या फेसबुक पेजवर इराकमधील आपले छायाचित्रे अपडेट कर‍ित असते. 25 एप्रिल रोजी सामंथाने कुर्दीश झेंड्यासह आपला फोटो पोस्ट केला होता. तिच्याप्रमाणेच पाश्‍चात्त्य देशातून 100 पेक्षा जास्त लोक कुर्दीश बंडखोरांबरोबर इस्लामिक स्टेटशी दोन हात करित आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, इस्लामिक स्टेटशी दोन हात करित असलेल्या अमेरिकेहून इराकमध्‍ये आलेल्या सामंथाची काही छायाचित्रे...