आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्र्याच्या कानात अवतरले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, इंटरनेटवर VIRAL

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेचे सर्वात बिनधास्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या लुक्समुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांची केशरचना जगभरात प्रसिद्ध आहे. प्रचारादरम्यान आणि राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतरही त्यांनी आपले केस 100 टक्के खरे असल्याचे स्पष्ट केले. ट्रम्प आपल्या लुकमुळेच पुन्हा इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहेत. अमेरिकेत एका व्यक्तीने सहज आपल्या श्वानचे कान खाजवताना जे पाहिले, त्यावर त्याला विश्वास बसत नव्हता. आपल्याला जे दिसतेय ते सगळ्यांनाच दिसतेय का हे पाहण्यासाठी त्याने कुत्र्याच्या कानातील फोटो काढून ट्विट केला. काही मिनिटांतच त्याचा तो फोटो हजारो लोकांनी रीट्विट केला. प्रत्येकाने या श्वानाच्या कानात ट्रम्प यांची आकृती दिसत असल्याचे मान्य केले. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, यापूर्वी लुक्समुळे व्हायरल झालेले ट्रम्प यांचे काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...