आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American President Obama Commented On Bashar Al Asad

असाद, सत्ता सोडा... नंतरच गृहयुद्ध समाप्ती शक्य, आेबामा यांचे खडे बोल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅपेक परिषदेच्या निमित्ताने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेऊ यांच्याशी चर्चा करताना आेबामा
मनिला- सिरियात राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांनी सत्ता सोडली पाहिजे. त्यानंतरच गृहयुद्ध संपेल, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी आपली भूमिका मांडली. त्याचबरोबर मध्य-पूर्वेतील नेत्यांनी देशातील निवडणुकीसाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे आेबामा यांनी म्हटले आहे.

असाद यांच्या सत्तेला अमेरिकेने पाठिंबा दिला तरी देशातील बंडखोर ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. अर्थातच असाद यांना देशातून बहुमत मिळणार नाही. जनतेला अशा प्रकारची तडजोड कदापि मान्य नाही, असे आेबामा म्हणाले. असाद यांचेे समर्थक तथा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वी आेबामा यांनी चर्चा केली होती. त्या वेळी दोन टोके एकत्र आल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर आेबामा यांच्या वक्तव्याला महत्त्व आले आहे. कारण सिरियातील आपल्या सैनिक तैनातीवर मागे हटणार नसल्याचे व असाद यांनी सत्ता सोडू नये, असे रशियाने उघडपणे स्पष्ट केले आहे. गेल्या चार वर्षांपासून सिरियन जनता गृहयुद्धात होरपळून निघाली आहे. त्याचा फायदा इस्लामिक स्टेट ही दहशतवादी संघटना घेण्याचा प्रयत्न करत आहे. आयएसने भूप्रदेश, मालमत्ता मिळवली आहे. एवढेच नव्हे तर बंडखोरांना संघटनेत सामील करून घेतले आहे.

निर्वासितांवरून रिपब्लिकन
बसले अडून : पुढल्या वर्षी १० हजार सिरियन नागरिकांना अमेरिकेत सामावून घेण्यासाठी आेबामा प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु त्याला रिपब्लिकन सदस्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि व विरोधक यांच्यात संघर्षाची स्थिती पाहायला मिळत आहे. सरकारने त्यासाठी विधेयक मांडले आहे. नवीन धोरणाला मंजुरी मिळाल्यास फ्रान्स, युराेपमधील नागरिकांना अमेरिकेत येण्यासाठी व्हिसाची गरज भासणार नाही. पॅरिस हल्ल्यामुळे आपण भावनिक होऊन कोणत्याही प्रकारचे चुकीचे पाऊल उचलता कामा नये. देशातील २७ राज्यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवल्याने दबाव वाढला आहे.

१६० रशियन आयएस दहशतवाद्यांचा खात्मा
मॉस्को- रशियातून सिरियात गेलेल्या व इस्लामिक स्टेटसाठी लढणाऱ्या शेकडो दहशतवाद्यांपैकी १६० जण सिरियात ठार झाले. सिरियात सुमारे २ हजार ७०० वर रशियन आहेत. ते कट्टरवादाने झपाटलेले आहेत. त्यापैकी ७३ जण परतताच त्यांना अटक केली, असे रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री आेलेक सिरोमोलोटोव्ह यांनी सांगितले.

आयएसकडून सिरियात आेलिसांची हत्या
बैरूत- सिरियातील एका वर्चस्व असलेल्या भागात रशियाच्या हवाई दलाने केलेल्या हल्ल्यास उत्तर देण्यासाठी इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी दोन आेलिसांची हत्या केली. मृतांत चीन आणि नॉर्वेच्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दोघांनाही फासावर लटकावण्यात आले. पॅरिसमधील हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी हे कृत्य केले. पॅरिस हल्ल्यात १२९ जणांचा मृत्यू झाला.