आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅलेस्टाइनला स्वायत्त राष्ट्र म्हणण्यापूर्वी ट्रम्प थबकले, नागरिकांचे निदर्शने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेथेलहॅम - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इस्रायल दौऱ्यानंतर मंगळवारी पॅलेस्टाइनच्या दौऱ्यावर रवाना झाले. त्यांनी पवित्र स्थळांना भेट दिली. नाझींद्वारे ठार केलेल्या लाख ज्यूंच्या स्मारकावर जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. ब्रिटनच्या मँचेस्टर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.
 
मी दहशतवाद्यांना सैतान म्हणणार नाही. त्यांना मी पराभूत झालेल्या वाईट प्रवृत्ती असे मानतो. इस्रायल आणि पॅलेस्टाइनदरम्यान शांती प्रस्थापित होण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करेन, असे ते या वेळी म्हणाले. मात्र, पॅलेस्टाइन स्वतंत्र, सार्वभौम राष्ट्र अाहे असे म्हणण्यापूर्वी ते थबकले. पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांची त्यांनी प्रशंसा केली.
 
ट्रम्प पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या आणि इस्रायलच्या ताब्यातील बेथेलहॅम येथे गेले. यावर इस्रायलने कब्जा करून पुढच्या आठवड्यात ५० वर्षे पूर्ण होतील. तेथे त्यांनी पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की इस्रायल आणि पॅलेस्टाइनदरम्यान ते शांततापूर्ण तोडगा काढतील. मात्र, काही ठोस योजना त्यांनी सांगितली नाही. त्यांनी आपले ज्यू वंशीय जावई जॅरेड कुशनर यांना मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी वरिष्ठ सल्लागार पदी नियुक्त केले आहे. पॅलेस्टाइन आणि इस्रायलदरम्यान शांती वार्ता करण्याचे प्रयत्न एप्रिल २०१४ मध्ये जॉन केरी यांनी केले होते.
 
नेतन्याहू आणि अब्बास दोघांनाही शांतता हवी आहे. मात्र, तेथील परिस्थिती याला अनुकूल नाही. ट्रम्प जेरुसलेममध्ये असताना पूर्व जेरुसलेमवर इस्रायलचा अवैध कब्जा असल्याची ठाम भूमिका अब्बास यांनी मांडली. १९६७ च्या युद्धात इस्रायलने याच परिसरात कब्जा केला होता.
 
विरोधही झाला
पॅलेस्टाइन दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांच्याविरोधात निदर्शने झाली. निदर्शकांचे म्हणणे होते की, ट्रम्प यांनी इस्रायलच्या तुरुंगातील कैद पॅलेस्टिनी नागरिकांच्या सुटकेसाठी मध्यस्थी का केली नाही?
 
...आणि ट्रम्प यांनीही सलामी दिली
पॅलेस्टाइनच्या राष्ट्रपती भवनात विचित्र स्थिती निर्माण झाली. पॅलेस्टाइन लष्करी अधिकाऱ्याने ट्रम्प यांना सलामी दिली. त्याला प्रतिसाद देताना ट्रम्प यांनीदेखील त्याला सलामी दिली. ही घटना फार दुर्मिळ आहे. असे दृश्य पाहण्यास मिळत नाही. त्यामुळे उपस्थित चकित झाले.
बातम्या आणखी आहेत...