आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सर पेशींचे दहा सेकंदांत होणार निदान, अमेरिकी शास्त्रज्ञांनी विकसित केला पेन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेक्सास (अमेरिका)- अमेरिकी शास्त्रज्ञांनी एक अनोखा पेन विकसित केला आहे. हे पेनच्या आकारातील उपकरण केवळ १० सेकंदांत शरीरातील कर्करोगाच्या पेशींचे निदान करेल. यामुळे कॅन्सरचे लवकर निदान होऊन तो पूर्णपणे बरा करण्यास मदत होईल. चाचणीत या उपकरणाचे निष्कर्ष ९६% योग्य आढळले. उपकरण येत्या वर्षात बाजारात येईल.  

टेक्सास विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हे उपकरण विकसित केले आहे. कॅन्सरची शक्यता असणाऱ्या भागात पेन ठेवला जातो. पेनातून पाण्याचा लहान थेंब निघतो. यानंतर जिवंत पेशीमधील रसायन पाण्याच्या थेंबाकडे जाऊ लागते आणि चाचणीसाठी हे द्रव्य पेन शोषून घेतो. पेन स्पेक्ट्रोमीटरशी जोडला आहे. स्पेक्ट्रोमीटर दर सेकंदास हजारो रासायनिक मात्रा मोजू शकतो. या पेनद्वारे एकप्रकारे तयार झालेले केमिकल फिंगरप्रिंट डॉक्टरास रुग्णाच्या पेशीत कॅन्सर आहे की नाही याची माहिती देते. सामान्य व कॅन्सर पेशीतील फरक ओळखणे आव्हान ठरले आहे. या पेनमुळे लहानातील लहान कॅन्सर पेशी काढता येतील.

१.५ मिमीपर्यंतची पेशी ओळखली जाते  
या पेनने १.५ मिमीपर्यंतची पेशी ओळखली जाऊ शकते. आतापर्यंत याच्या २५३ नमुन्यांची चाचणी घेतली असून निष्कर्ष अचूक निघाले. शास्त्रज्ञांनुसार, ०.६ मिमीची पेशी ओळखता यावी यासाठी उपकरणात आणखी सुधारणा केली जाईल. हा पेन स्वस्त असला तरी त्यासोबतचा स्पेक्ट्रोमीटर महाग व वजनदार आहे. स्पेक्ट्रोमीटर लहान करण्याचाही प्रयत्न सुरू आहे.

भारतात १२.५% रुग्णांवरच प्राथमिक टप्प्यात उपचार
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार, देशात १२.५% रुग्णच या रोगाच्या प्राथमिक टप्प्यात कॅन्सरवर उपचार करू शकतात. या रुग्णांना कॅन्सर झाल्याचे उशिराने कळते. एवढेच नव्हे, तर २०२० मध्ये देशात सुमारे १७.३ लाख कॅन्सरचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. सन २०२० मध्ये कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ८.८ लाख होऊ शकते. २०१६ मध्ये १४.५ लाखांहून जास्त रुग्णांच्या वैद्यकीय चाचणीत कॅन्सरचे निदान झाले.  
बातम्या आणखी आहेत...