आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन खासदारांचा पाकविरोध, अतिरेकी संघटनांच्या विरोधात ठोस पावले न उचलल्याने नाराज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - पाकिस्तानविरोधात निर्णायक पावले न उचलल्यामुळे नाराज अमेरिकेच्या खासदारांनी अमेरिका सरकारला धारेवर धरले आहे. दरम्यान, इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळाजवळ असलेल्या एका गावावर अतिरेक्यांनी कब्जा केला आहे.

पाकिस्तान सरकारने लष्कर-ए-तोयबा, लष्कर-ए-झांगवी आणि जैश-ए-मोहंमदसारख्या अतिरेकी संघटनांविरोधात काही कारवाई न केल्यामुळे त्यांच्यासोबत चांगले संबंध ठेवणे योग्य नसल्याचे या खासदारांचे मत आहे. हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्हजच्या परराष्ट्र प्रकरणांशी संबंधित समितीने परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांना याबाबत पत्र लिहिले आहे. मुंबई हल्ल्याचा मास्टमाइंड हाफिज सईदचे पाकमध्ये खुलेआम फिरणे आणि त्याच्या सभेला पाक सरकारकडून दिल्या जाणा-या परवानगीचाही या खासदारांनी विरोध केला आहे. दरम्यान, आपण अद्याप हे पत्र पाहिले नसल्यामुळे त्यावर कोणतेही वक्तव्य करणे योग्य नसल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते जेन साकी यांनी म्हटले आहे. मात्र, क्रिकेट विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांदरम्यान झालेल्या चर्चेचे त्यांनी स्वागत केले आहे.