आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंगापूर जाणाऱ्या अमेरिकी युद्धनौकेनेची तीनपट मोठ्या टँकरला धडक, 10 जवान बेपत्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या युद्धनौकेला अमेरिकेतील सिनेटर जॉन मॅक्केन यांच्या आजोबांचे नाव देण्यात आले होते. ते अमेरिकी नौदलाचे अॅडमिरल होते. - Divya Marathi
या युद्धनौकेला अमेरिकेतील सिनेटर जॉन मॅक्केन यांच्या आजोबांचे नाव देण्यात आले होते. ते अमेरिकी नौदलाचे अॅडमिरल होते.
सिंगापूर- ‘जॉन मॅक्केन’ या अमेरिकेच्या क्षेपणास्त्ररोधी युद्धनौकेने त्याच्यापेक्षा आकाराने तीनपट मोठ्या तेलाच्या टँकरला धडक दिली आहे. सिंगापूरच्या समुद्रकिनाऱ्याजवळील या अपघातात अमेरिकी नौदलाचे १० जवान बेपत्ता, तर ५ जखमी आहेत. मलक्कामार्गे सिंगापूर जाणाऱ्या तेलाच्या टँकरवर लायबेरियाचा राष्ट्रध्वज होता. अपघातात टँकरचे काही नुकसान झाले नाही. अमेरिकी युद्धनौकेत २४ अधिकाऱ्यांसह ३४८ लोक होते. पूर्व आशियाच्या समुद्रांत या वर्षभरात अमेरिकेच्या ४ क्षेपणास्त्र रोधक युद्धनौकांनी अन्य जहाजांना धडक दिली आहे.

१७ जून रोजी जपानच्या समुद्रकिनाऱ्यावर ‘यूएसएस फिट्सझेराल्ड’ने मालवाहू जहाजास धडक दिली होती. त्यात नौदलाचे ७ जवान ठार झाले. मलेशिया प्रशासनानुसार, सिंगापूर-दक्षिण चीन सागर हा सर्वात व्यस्त जलमार्गांपैकी एक आहे. येथून दरवर्षी ८० हजार जहाज ये-जा करतात.
 
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही अत्यंत वाईट घटना असल्याचे म्हटले आहे. ट्विटरवरून ते म्हणाले, यूएसएस जॉन मॅक्केन युद्धनौकमधील अमेरिकेच्या नौदलांच्या जवानांप्रती आमच्या संवेदना आहेत. त्यांची शोधमोहीम सुरू आहे.

टँकरमध्ये होते १२ हजार टन इंधन  
१८३ मीटर लांबीच्या या तेलाच्या टँकरचे ५० हजार टनांहून जास्त वजन होते. त्यात १२ हजार टन इंधन तेल होते. हे तेल सिंगापूरहून तैवानला नेले जाणार होते. अपघातानंतर समुद्रात तेल सांडल्याची माहिती अद्याप नाही.   

हा बेजबाबदारपणा, नौदल प्रशिक्षणाचे समीक्षण व्हावे- लष्कर तज्ज्ञांचे ताशेरे  
नौदलाकडून होत असलेल्या अपघातांवर लष्कर तज्ज्ञांनी ताशेरे ओढले आहेत. लष्कर विषयक तज्ज्ञ रिक फ्रांससोना यांच्या मते, या घटनांसाठी नौदलाचे नेतृत्व जबाबदार आहे. नौदलाचे प्रशिक्षण आणि पात्रता प्रक्रियेचे समीक्षण व्हायला हवे. या उच्च क्षमतेच्या युद्धनौका असल्याने अपघात टाळता आला असता. यात मल्टिपल रडार यंत्रणा असल्याने समोरून येणारे ३० हजार टनांचे जहाज न दिसणे शक्य नाही. हा बेजबाबदारपणा आहे.   
 
 
बातम्या आणखी आहेत...