आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फिफा २०१० विश्वचषक आणि २०११ च्या अध्यक्षपद निवडणुकीत गैरव्यवहाराचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - फिफाच्या फुटबाॅल सामन्यातील तब्बल ९६० काेटींच्या अार्थिक गैरव्यवहाराने खळबळ उडाली अाहे. यामुळे अार्थिक घाेटाळ्याबाबत नवनवीन प्रकरणेदेखील अाता हळूहळू समाेर येत अाहेत. यात अाता २०१० मध्ये अार्थिक गैरव्यवहार करून विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेचे यजमानपद दक्षिण अाफ्रिकेला देण्यात अाल्याचा गौप्यस्फाेट अमेरिकेचे महाधिवक्ता लाॅरेटा लिंच यांनी केला अाहे. त्यामुळे फिफा ची लक्तरे वेशीवर टांगली जात अाहेत.
तसेच अागामी २०१६ च्या अमेरिकेत हाेत असलेल्या काेपा अमेरिकन फुटबाॅल स्पर्धा अाणि गत २०११ फिफाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माेठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचाही अाराेप लिंच यांनी केला अाहे. ‘फिफाच्या अधिकाऱ्यांनी अापल्या पदाचा दुरुपयाेग केले अाहे. त्यामुळे गैरव्यवहाराचे प्रकरण घडले अाहे. यामुळे फुटबाॅलची प्रतिष्ठा धुळीत मिळाली अाहे,’ असेही लिंच म्हणाले.
हा अमेरिकेचा डाव : पुतीन
अागामी २०१८ ची विश्वचषक फुटबाॅल स्पर्धा हाेऊ नये, म्हणूनच अमेरिकेने अशा प्रकारच्या अाराेपांची ताेफ डागली अाहे, अशी स्पष्टाेक्ती रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली. याबाबत करण्यात येत असलेले अनेक अाराेप सिद्ध हाेणार नाहीत अाणि रशियातच विश्वचषक स्पर्धा अायाेजित केली जाईल, असा विश्वासही पुतीन यांनी व्यक्त केला.
भष्ट्र अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता : ब्लॅटर
झुरिच । फुटबाॅलच्या सामन्यातील ९६० काेटींच्या गैरव्यवहार प्रकरणातील दाेषी अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, अशी माहिती फिफाचे अध्यक्ष सॅप ब्लॅटर यांनी दिली. नुकताच फुटबाॅल सामन्यातील ९६० काेटींचा घाेटळा उघडकीस अाला अाहे. त्यामुळे फुटबाॅलच्या विश्वात चांगलीच खळबळ उडाली अाहे. तसेच जगभरात या गैरव्यवहारने फुटबाॅलची प्रतिष्ठा धुळीत मिळाली अाहे, अशी खंतदेखील माजी खेळाडूंनी व्यक्त केली अाहे. ‘फुटबाॅल सामन्यांतील ९६० कोटींच्या घाेटाळा प्रकरणातील सहभागी सात अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. या सर्वांना बाहेर केले जाणार अाहे. तसेच या प्रकरणात संशयित म्हणून ११ जणांना ताब्यात घेतले अाहे. त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई केली जाईल,’असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...