आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Americas most haunted building eastern state penitentiary

PHOTO: अमेरिकेतील सर्वात भयावह जेल, इथे अजूनही कैद्यांच्या ओरडण्याचा, रडण्याचा येतो आवाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्लोरिडा: अमेरिकेच्या फिलाडेल्फीया येथे असलेल्या 'ईस्टर्न स्टेट पेनीटेनशियरी' जेल जगातील सर्वात 'भयावह' जागांपैकी एक मानली जाते. येथील गुन्हेगार केवळ बाहेरील जगाच्या वेगवेगळ्या शहरातीलच नव्हते, तर येथे या गुन्हेगारांना इतर गुन्हेगारांशी संपर्कही साधता येत नव्हता.
1971 मध्ये बंद झालेल्या या जेलला 1996 मध्ये एक वस्तूसंग्रहालय म्हणून सुरू करण्यात आले. आता येथे येणाऱ्या पर्यटकांनी असे सांगितले आहे की, या जेलमधल्या कमकुवत झालेल्या भिंतिंमधून आम्हाला ओरडण्याचे, रडण्याचे आवाज येतात. काहींनीतर त्यांना येथील कैद्यांची सावलीही दिसल्याचे सांगितले आहे.
वेबसाईड डेलिमेलच्या अहवालानुसार, 1829 मध्ये बांधण्यात आलेल्या या जेलमध्ये कैद्यांना सिंगल सेलमध्ये बंद केले जात होते. या कैद्यांवर अत्याचार करण्याच्या बाबतीत हे जेल नेहमीच वादांमध्ये असायचे. येथील जेलर आणि इतर पोलिस हे खुपच क्रूर मनोवृत्तीचे होते. या कैद्यांना सेलमधून बाहेर आणताना त्यांचे चेहरे हे कापडाने बंद केले जात होते. असे सांगण्यात येते, जो कैदी जेलरचे म्हणणे ऐकत नसेल त्याच्यावर जास्त अत्याचार केले जात.
वेबसाईट एनपीआरकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील टॉर्चर टेक्नीकमध्ये 'वॉटर बाथ' नेहमीच चर्चेत असायचे. यामध्ये पहिले कैद्यांना पाण्यात बुडवले जात होते, त्यानंतर त्यांना बाहेर काढून वाळण्यासाठी सोडले जात असायचे. अगदी कडाक्याच्या थंडीतही जोपर्यंत कैद्यांच्या शरीरावरील पाणी बर्फ होत नाही. तोपर्यंत त्यांना उतरवले जात नव्हेत. यावरूच या कैद्यांवरील अत्याचाराचा अंदाज येतो. याशिवाय एक 'मॅड चेयर' सुध्दा होत. ज्यावर बसवून कैद्यांच्या शरीराला कापले जात असायचे.

1996 नंतर हे हॅलोविन अट्रॅक्शनचे केंद्र बनले. येथे अनेक पर्यटकांचे अहवाला असे सांगतात की, त्यांना येथे त्या कैद्यांच्या आत्मा भटकताना दिसतात, ज्यांच्यावर फार पुर्वी अत्याचार केले गेले होते. काहींनीतर असा दावा केला आहे की, या ठिकाणी त्या कैद्यांच्या रडण्याचे, ओरडण्याचे आवाज येतात, एवढेच नाही तर त्यांच्या पायांचा आवाजही येतो. या अहवालानुसार, सेल ब्लॉक -12 अत्यंत भयावह हास्य आणि सुरक्षारक्षकांच्या सावल्या यांमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, या भूतहा जेलची इतर छायाचित्रे जी तुम्हाला घाबरवून टाकतील ...