आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हाइट हाऊस बाॅम्बने उडवण्याची धमकी, मीडिया ब्रीफिंग रूममधून पत्रकारांना हलवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - व्हाइट हाऊसला बाॅम्बने उडवून देण्याची धमकी सुरक्षा यंत्रणेला मिळाली. त्यामुळे मीडिया ब्रीफिंग रूममधून पत्रकारांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. सुरक्षा यंत्रणेला ही धमकी मिळाली होती. मंगळवारची ही घटना असून बुधवारी ती उघड झाली आहे.
धमकी मिळाली तेव्हा मीडिया रूममध्ये पत्रकार होते. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी शिताफीने त्यांना जवळच असलेल्या आयसेनहॉवर इमारतीमध्ये हलवले. तपासाची कडक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पत्रकारांना पुन्हा त्या खोलीत सोडण्यात आले. राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा त्या वेळी त्यांच्या आेव्हल येथील कार्यालयात तर मिशेल कुटुंबासोबत व्हाइट हाऊसमध्ये आपल्या कुटुंबीयांसमवेत सुरक्षित होत्या. फोनवरून ही धमकी मिळाली होती. त्यात व्हाइट हाऊसच्या मीडिया रूमला उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती, अशी माहिती गुप्तहेर विभागाचे प्रवक्ते ब्रायन लिरी यांनी दिली. पत्रकारांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...