आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे अमेरिकेतील सर्वात लांब पाय असलेली महिला, उंची आहे 6 फूट 4 इंच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील सर्वात लांब पाय असलेली महिला. - Divya Marathi
अमेरिकेतील सर्वात लांब पाय असलेली महिला.
वॉशिंग्टन - 26 वर्षांची लॉरेन विल्यम्स अमेरिकेतील सर्वात लांब पाय असलेली महिला बनली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार तिच्या पायांची लांबी 49 इंच आहे. टेक्सासमध्ये राहणाऱ्या लॉरेनच्या मते, तिच्या वयाच्या इतर मुलींच्या तुलनेत तिचे पाय सुरुवातीपासूनच अधिक लांब होते. यापूर्वी अमेरिकेची ब्रूक बँकर हिचे पाय सर्वात लांब (47 इंच) होते.
लॉरेन विल्यम्सची एकूण उंची 6 फूट 4 इंच आहे. हा किताब तिला मिळाल्याचा आनंद झाल्याचे तिने सांगितले. लॉरेनच्या या आनंदाचे मोठे श्रेय तिच्या कुटुंबालाही आहे. तिचे आई वडील आण दोन्ही बहिणी सर्वांची उंची 6 फुटांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे त्यांना कपडे खरेदी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो असे लॉरेन म्हणाली. लॉरेन ही एक मॉडेल आहे. स्पोर्ट्स फिटनेस आणि स्विमवेअरसह अनेक ब्रँड्ससाठी तिने ब्रँडींग केले आहे. त्यात नाइकसारख्या कंपनीचा समावेश आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, लॉरेनचे काही PHOTOS