आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Apple चे अत्याधुनिक ऑफिस तयार, 13 हजार कर्मचारी एकत्र काम करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅपलचे हे हेड क्वार्टर कॅलिफोर्नियातील क्यूपरटिनोत तयार झाले आहे. - Divya Marathi
अॅपलचे हे हेड क्वार्टर कॅलिफोर्नियातील क्यूपरटिनोत तयार झाले आहे.
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकन मल्टीनॅशनल टेक्नोलॉजी कंपनी अॅप्पलचे अमेरिका स्थित नव्या ऑफिसमध्ये फोटोज समोर आले आहेत. कॅलिफोर्नियातील क्यूपरटिनोत बनत असलेली अलिशान बिल्डिंगचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. क्यूपरटिनोचे एक्स मेयर गिलबर्ट वॉन्ग यांच्या माहितीनुसार, लवकरच या बिल्डिंगचे काम पूर्ण होईल आणि ऑफिस कर्मचा-यांसाठी उपलब्ध करून दिले जाईल. 13 हजार कर्मचारी बसू शकतात या बिल्डिंगमध्ये...
 
- या नव्या बिल्डिंगला ‘अॅपल पार्क’ नाव दिले गेले आहे, जे स्पेसशिप सारखे आहे.  
- सुमारे 175 एकरात पसरलेले हे ऑफिस जगातील सर्वात मोठे ईको फ्रेंडली ऑफिस आहे. 
- ऑफिसच्या बाहेरच नाही, तर कॅम्पस एरियात इतकी हिरवळ आहे की, कर्मचा-यांना निसर्गाच्या सानिध्यात असल्यासारखे वाटेल. 
- ऑफिसमध्ये नैसर्गिक हवा आणि सुर्यप्रकाश येईल याची पूर्ण काळजी घेतली गेली आहे. ज्यामुळे वर्षातील नऊ महिने ऑफिसमध्ये एसीची गरज खूपच कमी राहील. 
- या बिल्डिंगची खास बाब ही की, याच्या पायाभरणीत 700 ‘बेस आयसोलेशन’ जोडले गेले आहेत, ज्यात भूकंप आला तरी इमारतीला नुकसान होणार नाही. 
- आत्पकालीन स्थितीला तोंड देण्यासाठी कॅम्पसमध्ये रूग्णालय, फायर हाऊस, पोलिस स्टेशन यासारख्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
- येथे एक हजार लोक बसू शकतील या क्षमतेचे एक ऑडिटोरियम सुद्धा बनवले गेले आहे, ज्यात कंपनीचे अधिकारी कंपनी संबंधित माहिती मीडिया आणि अन्य इतर लोकांशी देऊ शकतील. 
- या बिल्डिंगसाठी एकून 33हजार 412 कोटी रूपये (5 बिलियन डॉलर) खर्च आला आहे. चार मजली इमारतीत सर्वात मोठे 360 डिग्रीत कोडवर वाकलेले ग्लास लावलेले आहेत.  
- या ऑफिसचे पूर्ण डिझाईन अॅप्पलचे संस्थापक स्टीव जॉब्सने 2011 मध्ये केले होते. हे ऑफिस जॉब्सचे स्वप्न मानले जाते.
- मात्र, 5 ऑक्टोबर, 2011 मध्ये त्याचे निधन झाले. त्याच्या स्मरणार्थच तेथे एक थिएटर बनवले गेले आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अॅप्पलच्या या नव्या ऑफिसचे 10 फोटोज...
बातम्या आणखी आहेत...