आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेहमी कोरियाच्या हुकूमशहासारखे वागतात फेसबुकचे सर्वेसर्वा झुकेरबर्ग, शिव्याही देतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅनफ्रान्सिको- फेसबुकमधून नोकरीवरून काढण्यात आलेले जाहिरात व्यवस्थापक अॅनटोनियो ग्रेशिया मार्टिनेझ यांनी फेसबुकच्या कार्यप्रणालीविषयी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. दोन वर्षांपूर्वी फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी मार्टिनेझ यांना नोकरीवरून काढून टाकले होते. त्यानंतर मार्टिनेझ यांनी पुस्तक लिहिले. पुस्तकातील दाव्यानुसार, फेसबुकमध्ये काम करणे म्हणजे उत्तर कोरियात काम केल्यासारखे होय. यावर झुकेरबर्ग यांची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र, काही लोकांनी यास मार्टिनेझचा खोडसाळपणा म्हटले आहे.
मार्टिनेझ यांच्या मते, फेसबुक कंपनीचे इतके मोठे नाव आहे. त्या कंपनीला आज जगभरात वेगळी प्रतिष्ठाही आहे. परंतु दिसते तशी ही कंपनी नाही. या कंपनीत कर्मचारी अधिकाऱ्यांवर कंपनीचे सीईओ झुकेरबर्ग यांची उत्तर कोरियाच्या हुकूमशहाप्रमाणेच हुकूमशाही चालते. फेसबुकमध्ये रुजू होणाऱ्या नवीन कर्मचाऱ्याला “फेसवर्सरी’ म्हटले जाते. त्यासाठी ख्रिसमसप्रमाणे उत्सव साजरा केला जातो. मात्र, कुणी नोकरी सोडतो तेव्हा त्यास “डेथ’ म्हटले जाते. त्याच्या ओळखपत्राची चिरफाड करून छायाचित्र अपलोड केले जाते. त्यातल्या त्यात महिला कर्मचाऱ्याला सर्वाधिक त्रास दिला जातो. पुरुष कर्मचाऱ्यांचे या महिलांकडे लक्ष जाऊ नये म्हणून महिलांना सातत्याने कंपनीने ठरवून दिलेल्या ड्रेसकोडमध्येच वावरावे लागते. त्यांना शॉर्ट स्कर्ट घालण्यास अगदी सक्त मनाईच आहे. याशिवाय सर्वांत धक्कादायक प्रकार म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्यावर लक्ष देण्यासाठी गुप्तचर संस्थेसारखीच अंतर्गत पोलिस आहे. यास सेक म्हटले जाते.

झुकेरबर्ग यांनी लवकर राग येतो आणि रागाच्या भरात ते कर्मचाऱ्यांना शिव्या घालतात. त्या वेळी कर्मचाऱ्यांना ते काहीही करायला लावतात. उदा: भिंती रंगवणे, टेबल साफ करणे. २०११ मध्ये गुगल प्लस आले तेव्हा झुकेरबर्ग यांनी यास “टोटल वॉर’ असे संबोधले होते. गुगल प्लस झुकेरबर्ग यांच्यावर एखाद्या बॉम्बसारखा पडला होता आणि त्याने संपूर्ण कंपनीच धोक्यात आणली होती. जेव्हा ठराविक जाहिरातींबाबत बैठक व्हायची तेव्हा झुकेरबर्ग तांत्रिक तपशील पाहायचेच नाही. कारण, त्यांच्यात सहनशक्ती नाही. कंपनीची सीओओ सेंडबर्गसुद्धा तशीच अाहे. तिला फक्त चांगल्या गोष्टी ऐकायच्या असतात म्हणून बैठक खोलीला “ओनली गुड न्यूज’ म्हटले जाते. सेंडबर्गने एकदा आपल्या प्रेझेंटेशनच्या वेळी वापरकर्त्यांऐवजी चक्क मांजरीचे छायाचित्र वापरले होते.
पुढील स्लाइ्ड्सवर पाहा, कोण आहे अॅनटोनियो ग्रेशिया
बातम्या आणखी आहेत...